महानगरपालिकेची शहरात धडक अबेट मोहीम...

महानगरपालिकेची “धडक अबेट मोहीम...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)
धडक अबेट मोहीमेचा दुसरा टप्पा दि.1/7/2025 ते 7/7/2025 पर्यत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार
व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत आहे.
आज दि. 2/7/2025 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते झोन क्र. 9 येथील
धडक अबेट मोहीमेचे शुभारंभ संत एकनाथ रंगमंदिर येथून करण्यात आला. याप्रंसगी डॉ. पारस मंडलेचा यांनी सर्व
अतिजोखमीच्या विभागात अबेटिंग तसेच एमएलओ ऑईलचा छिडकाव पावसामुळे साठलेल्या डबक्यांमध्ये टाकणे,
हस्तपत्रिका वाटप, स्टिकर्स वाटप, याद्वारे जनजागृती करण्याच्या सुचना दिल्यात डॉ. अर्चना राणे, डॉ. संकलेचा, डॉ. भामरे,
डॉ. स्नेहा नरवडे, डॉ. अश्विनी सिंगु, डॉ. आदित्यकुमार जोशी व इंचार्ज सिस्टर श्रीमती ज्योती अमोलिक, श्रीमती शुभांगी
भोपळे, आशावर्कर सुपरवाईझर सुनिता नवगिरे, वंदना लोधवाल आरोग्य केंद्र पीरबाजार, बन्सीलालनगर, कबीरनगर, क्रांतीचौक
येथील एमपीडब्ल्यु, आशावर्कर्स मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक चुन्नीलाल उदणे, अन्वर शेख,
रत्नाकर साबळे, उमाकांत गायकवाड व मलेरिया कर्मचारी उपस्थित होते.
दि.1/7/2025 रोजी मोहीमेची सुरुवात झोन क्र. 2 जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा येथे सहाय्यक आरोग्य
अधिकारी डॉ.अर्चना राणे यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले. दि.1/7/2025 रोजी झोन क्र. 2 मधील
सुराणानगर, कैलाश नगर, संजयनगर, झोन क्र. 6 मधील विठठलनगर, कामगार कॉलनी, चिकलठाणा व झोन क्र.10
मधील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मोदीनगर हया भागामधे कर्मचा-याद्वारे सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात
आल्या.
दि. 1/7/2025 रोजी 176 मलेरिया व आरोग्य विभागातील कर्मचा-यांमार्फत एकुण 9170 घरांचे सर्वेक्षण
करण्यात आले. यावेळी एकुण 61825 कंटेनर्स तपासण्यात आले. त्यापैकी 216 कंटेनर्स मध्ये डास अळया आढळून
आल्या. यानुसार 146 कंटेनर्स रिकामे करण्यात आले. आज एकुण 9479 घरांमधील पाण्यात अबेट टाकण्यात आले.
2394 घरांमध्ये किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली. 1051 हस्तपत्रिका वाटप करण्यात आले. 603 ठिकाणी स्टीकर्स लावण्यात आले.
What's Your Reaction?






