महापारेषण भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा...!
 
                                रखडलेली महापारेषण भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा...!
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरती सुरू करण्याची केली मागणी...
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज) हजारो इलेक्ट्रीकल तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करून महापारेषण स्पर्धा परीक्षेच्या तयारी करताना. वारंवार रखडलेली भरतीची जाहिरात प्रसिद्ध करुन भरतीची परीक्षा रद्द करण्यात येत असल्याने या विद्यार्थ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने आज सकाळी 11 वाजता शेकडो विद्यार्थ्यांनी क्रांतीचौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना विभागीय आयुक्त यांचे मार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे सन 2017 पासून भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. 2020 मध्ये तात्कालीन ऊर्जामंत्री 8500 पदाची भरती महापारेषणमध्ये करण्याचे जाहीर केले. 200 ते 300 जागा असल्याने ब-याच विद्यार्थ्यांनी नोकरी सोडून अभ्यास सुरू केला. लाॅकडाऊन असल्याने भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. 28 जून 2023 रोजी वृत्तपत्रात 3129 जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2023 रोजी पुन्हा जाहिरात आली. 20 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सुरू होईल. 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज घेण्यात आले. जाहिरात मध्ये कळवण्यात आले की फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये परीक्षा घेण्यात येईल. मात्र परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. पुन्हा 14 जून रोजी परिपत्रक काढून परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली. या परीक्षेत 8 पदांसाठी 3129 जागा होत्या सहा पदांच्या 870 पदांची परीक्षा झाली होती उर्वरित 2259 जागांच्या परीक्षा 2017 पासून झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलने व मोर्चा काढून मागणी केली तरीही आतापर्यंत सरकारने निर्णय घेतला नसल्याने आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            