महापालिका निवडणुकीची घोषणा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल...!

 0
महापालिका निवडणुकीची घोषणा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल...!

29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला...!आचारसंहिता लागू; मतदान 15 जानेवारीला, 16 जानेवारीला मतमोजणी...

आचारसंहिता लागू; प्रशासन सज्ज...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज):- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेसोबतच संबंधित सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे, निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार उमेदवारांसाठी नामनिर्देशनापासून ते मतदान व मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या निवडणुकांकडे राज्याचे राजकीय भवितव्य ठरवणारी लढत म्हणून पाहिले जात आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी:

23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशन पत्रांची छाननी:

 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख:

2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध:

3 जानेवारी 2026

मतदानाचा दिवस:

15 जानेवारी 2026

मतमोजणी:

16 जानेवारी 2026

आचारसंहिता लागू – काय असतील परिणाम...?

आचारसंहिता लागू झाल्याने कोणतीही जाहिरातबाजी, सरकारी योजनांची घोषणा, उद्घाटन कार्यक्रम यावर निर्बंध राहणार आहेत. प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना तटस्थ राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

महानगरपालिकांवरील सत्तेसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू असून, उमेदवार निवड, आघाड्या आणि प्रचार रणनिती याबाबत हालचालींना वेग येणार आहे.

आता खऱ्या अर्थाने शहरांच्या सत्तेची लढाई सुरू झाली आहे निकाल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे...!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow