महापालिका निवडणूक, आजपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती, कोठे भरायचा अर्ज..
महापालिका निवडणूक, आजपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- 7 व्या महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज व स्वीकृतीची प्रक्रीया सुरू होणार आहे. शंभर रुपयांत उमेदवारी अर्ज व सोबतच माहिती पुस्तिकेसाठी शंभर रुपये भरावे लागतील. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची वेळ आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग निहाय 9 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरू केली आहे.
29 प्रभागासाठी 9 निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असून महापालिकेच्या 5 झोन कार्यालयासह 4 ठिकाणी हि कार्यालये सुरू केली आहे. झोन कार्यालयाचे सर्व कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेले कर्मचारी काम करतील. प्रत्येक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना 300 असे 2700 उमेदवारी अर्ज पाठवले आहे. सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येतील. शासकीय सुट्या वगळून 30 डिसेंबर पर्यंत महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरता येईल. खुल्या वर्गासाठी 5 हजार रुपये, महीला व राखीव जागा लढणा-या उमेदवारांसाठी 2500 रुपये डिपाॅझिट भरावे लागणार आहे.
कोठे आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय...
1, 2, 7 प्रभाग क्रमांक - मनपा झोन -4 कार्यालय, टीव्ही सेंटर
3, 4, 5 प्रभाग क्रमांक - स्मार्ट सिटी कार्यालय, (घनकचरा विभाग)
8, 9, 10, 11 प्रभाग क्रमांक - गरवारे स्टेडियम जवळ, आयटी पार्क
6, 12, 13, 14 प्रभाग क्रमांक - उपविभागीय कार्यालय, तहसिलच्या शेजारी
15, 16, 17 झोन-2 कार्यालय, सिल्लेखाना
18, 19, 20 प्रभाग क्रमांक - मनपा झोन-9 कार्यालय, जालना रोड
21, 22, 27 विभागीय क्रीडा संकुल, मिशन लक्ष कार्यालय
23, 24, 25 मनपा झोन- 6 कार्यालय, सिडको
26, 28, 29 प्रभाग क्रमांक - मनपा झोन-8 कार्यालय, सातारा परिसर
What's Your Reaction?