भरपावसात मनपा आयुक्त जी.श्रीकांत पाण्यात भिजतात, सुट्टीच्या दिवशीही...

 0
भरपावसात मनपा आयुक्त जी.श्रीकांत पाण्यात भिजतात, सुट्टीच्या दिवशीही...

पावसातही थांबले नाही काम – जनतेच्या सेवेसाठी झटणारे प्रशासन...!

 

विकसनशील शहरासाठी पायाभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणं अत्यावश्यक आहे.”

– प्रशासक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) -

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री जी. श्रीकांत यांनी आज पावसाच्या प्रतिकूल हवामानातही जायकवाडी येथील सुरू असलेल्या जॅकवेल पाणीपुरवठा जलवाहिनीच्या कामाचे स्थळपाहणीद्वारे निरीक्षण केले. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून प्रत्यक्ष कामाची प्रगती पाहण्यासाठी अधिकारी स्वतः स्थळी पोहोचत आहेत.

पावसातही सुरू असलेल्या या जलवाहिनीच्या कामाची सखोल माहिती घेत श्री. श्रीकांत यांनी संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी कामाच्या गुणवत्तेची खातरजमा करत वेळेच्या चौकटीत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, पावसाळी कालावधीतही काम सुरळीत सुरू राहावे यासाठी आवश्यक सुविधा आणि उपाययोजना तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता नव्या पाणीपुरवठा योजनेचा दर्जेदार आणि यशस्वी अंमलबजावणी होणे हे नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनमानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 आयुक्तांच्या या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow