कर्णपुरा यात्रेचा शांतता व सुरक्षित वातावरणात आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
कर्णपुरा यात्रेचा शांतता व सुरक्षित वातावरणात आनंद घ्यावा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कर्णपूरा यात्रेचा शांतता व सुरक्षित वातावरणात आनंद घ्यावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यात्रा ठिकाणच्या सुविधा, सुरक्षितताचा आढावा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) – येत्या 3 ऑक्टोंरबर पासून सुरु होत असलेला शहरातील कर्णपूरा देवीच्या यात्रेची सुरवात होत आहे. ही यात्रा शांतता व सुरक्षित वातावारणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांसाठी स्वच्छता ,सुरक्षितीता व आरोग्यपुर्ण वातावरणात यात्रेचा आनंद घेता यावा. म्हणुन प्रशासनानी योग्य ती खबरदारी घेतली असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. यात्रे पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हााधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कॅन्टोनमेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री मारोती म्हस्के, आरोग्य अधिकारी डॉ.शैलजा मापारी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

     कर्णपुरा यात्रा महोत्सवातील स्वच्छते विषयी प्रशासनाने घ्यावयाची काळजी, नागरीकांना मंदिरापर्यत जाण्यासाठी प्रशासनाने रस्ता, गर्दीचे नियोजन करण्या विषयी माहिती दिली. महावीर चौकातील उड्डाणपूलाखाली गाड्यासाठी पार्किगसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, मंदिरापर्यत आत जाण्याची व बाहेर येण्याची वेगवेगळी व्यवस्था करावी, पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, यात्रेमध्ये बसणारे स्टॉलधारकांकडून फॉर्म भरुन घेण्यात येणारअसल्याची माहिती छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी, यांनी दिली.

कर्णपुरा यात्रा महोत्सेवात पोलीस बंदोबस्त, अग्निशामक दल , गणपती मंदीर जवळ आरोग्य कर्मचारी यांची टिम व एक रुग्णावाहिका सकाळी 8 ते सायंकाळी 10 पर्यंत उपलब्ध करुन देण्या्त यावी, मोबाईल टॉयलेट व स्वच्छता ठेवण्यात यावी , आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी स्टॉटलवाले यांचे नियोजन करावे, गॅस सिलिंडर वापर बाबत प्रशिक्षण घेण्यायत यावे, स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे नमुना चाचणी करणे, प्लास्टिक पिशवी बंदी ,कापडी पिशवीचा वापर करण्यात यावा, आकाश पाळणा, मौत का कुआँ यांचे स्ट्राक्चर तपासणी करण्यात यावे, यात्रा महोत्सवात सर्व विद्युत पुरवठा सुरु ठेवावा, ही यात्रा सुरक्षित व शातंतापूर्ण वातावरणात व्हा्वी, यासाठी सर्व संबंधित विभागाने योग्य ते समन्वय ठेऊन खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हालधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow