महापालिकेची "टॅक्स हिरो स्पर्धा" जिंका बक्षिस मिळवा, शहर बदला
"टॅक्स हिरो" स्पर्धा: जिंका बक्षिसे, बदला शहर!
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.20(डि-24 न्यूज) महानगरपालिकेने नागरिकांमध्ये कर भरण्याची भावना जागृत करण्यासाठी 'टॅक्स हिरो' ही एक नवीन आणि आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, नागरिकांना वेळेवर कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि कर उत्पन्नाचा शहराच्या विकासात होणारा योगदान स्पष्ट करणे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली.
या मोहिमेत करदाते, नागरिक, विद्यार्थी, कलाकार, इन्फ्लुएंसर, रील स्टार अशा सर्वच वर्गांना सहभागी होण्याची संधी आहे. सहभागींना एक मिनिटाचा व्हिडीओ तयार करून पाठवायचा आहे. या व्हिडीओत त्यांना कर भरण्याचे फायदे, कराचा शहराच्या विकासातला वाटा आणि त्यांच्या मते 'टॅक्स हिरो' कोण असू शकतो याबाबतचे विचार मांडायचे आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यांना अनुक्रमे 21,000, 15,000 आणि 11,000 रुपयांची रोख रक्कम देण्यात येईल. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले जाईल.
या मोहिमेच्या माध्यमातून महानगरपालिका नागरिकांमध्ये जास्तीत जास्त कर भरण्याची भावना रुजवून शहराच्या विकासात सर्वांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कराच्या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर विकास कामांसाठी केला जातो.
असे व्हा सहभागी
आपला व्हिडीओ +91 70580 40686 या क्रमांकावर पाठवा.
• व्हिडीओत आपले नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नक्की नमूद करा.
• व्हिडीओ मजेशीर, प्रेरणादायी किंवा माहितीपूर्ण असू शकतो.
• आपण पाठविलेल्या निवडक व्हिडीओला महानगरपालिकेच्या सोशल मीडियावर प्रसिद्धि दिली जाईल. आपण पाठविलेला व्हीडीओ कुठेही प्रसिद्धी झालेला नसावा.
• या मोहिमेअंतर्गत स्पर्धकांना 20 ऑगस्ट ते पाच सप्टेंबरदरम्यान व्हीडीओ पाठविण्यात यावे. त्यानंतर आलेले व्हीडीओ ग्राह्य धरले जाणार नाहीत.
What's Your Reaction?