महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन...!

 0
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन...!

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज) 

बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणी व्यवस्थापनातून मुक्त व्हावे व ते बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जगभरातील भिक्खू संघ, भिक्खूणी संघ आणि बौद्ध अनुयायी गया येथे उपोषण करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सोमवार, 3 मार्च रोजी भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भन्ते बोधीपालो महाथेरो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

बुद्ध गया येथे बौद्ध अनुयायांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शहरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘धम्म क्षेत्रात बुध्द गया येथील महाबोधी महाविहार सर्वश्रेष्ठ श्रध्दास्थान आहे. सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराची उभारणी केली. आचार्य अश्वघोष, आचार्य बुध्द घोष, या बौध्द विद्यापीठाचे आचार्य होते. जगभरातील बौद्ध अनुयायी बुध्दगयेला येत असतात. हे पवित्र श्रद्धास्थान ब्राह्मणांनी बळकावले आहे. त्यांचा बौध्द धम्माच्या श्रध्देशी, आचार-विचारांशी, नितीनियमांशी तीळमात्र संबंध नसताना केवळ विदेशातून डॉलर व सोन्याचांदीच्या स्वरूपात मिळणारी दानदक्षिणा हडपण्यासाठी अनधिकृतपणे बौध्द विहार ताब्यात ठेवलेले आहे’, असा आरोप भदंत बोधिपालो यांनी केला. ब्राह्मणी व्यवस्थानापनातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बुध्द गया येथे 15 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जगभरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेतील भिक्खू व अनुयायी आंदोलन करीत आहे. आंदोलन दडपण्यासाठी बिहार सरकार भिक्खूंना मध्यरात्री उचलून घेऊन जात आहेत. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे, असे भंते बोधिपालो यांनी सांगितले. 

दरम्यान, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार, तीन मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी पाच या वेळेत केले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले. या आंदोलनात सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन भिक्खू संघ व उपासक उपासिका संघ यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला भदंत कश्यप महाथेरो भदन्त ग्यानरक्षित थेरो, भदंत डॉ. /चंद्रबोधी सूर्यकांता गाडे, शरद जाधव, एस. आर. बोदडे, के. व्ही. दिवेकर, डॉ. प्रमोद दुथडे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow