बाजारपेठेत गर्दी, पहील्या इफ्तार खरेदीसाठी...!
बाजारपेठेत गर्दी, पहील्या इफ्तार खरेदीसाठी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) पवित्र रमजान महीन्याला सुरुवात झाली आहे. आज रविवारी रोजेदारांनी इफ्तारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. फळे व विविध खाद्य पेय, नरबत, ज्युस, पेंड खजूर यावेळी खरेदी केली. शहागंज, सिटीचौक, बुढीलेन, रोशनगेट, कटकट गेट, किराडपुरा येथे ग्राहकांनी इफ्तार खरेदीसाठी गर्दी केली होती. फळांचे दर मागच्या वर्षीसारखे आहे. कलिंगड, खरबूज, द्राक्षे, सफरचंद, डाळिंब, केळी,
पपई, अंजिर, चिकू, विविध प्रकारचे भजे यावेळी रोजेदार खरेदी करत होते.
What's Your Reaction?