मनपाला एमआयएमचा दोन दिवसांचा अल्टिमेटम....

मनपाला एमआयएमचा दोन दिवसांचा अल्टिमेटम....
उच्चतम बाजार समीतीने सुरु केलेला बांधकाम पाडणे, नवीन रेखांकणाला मंजूरी देऊ नये यासाठी केले व्यापारांसोबत धडक आंदोलन...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)
कृषी उच्चतम बाजार समीतीमध्ये अनाधिकृत बांधकामाची नोटीस दिली तरीही आतापर्यंत बांधकामावर अतिक्रमण विभागाने कार्यवाही केली नाही दोन दिवसांनंतर कार्यवाही केली नाही तर एम आय एम बांधकाम पाडणार असल्याचा इशारा मनपा समोर दुपारी केलेल्या धडक आंदोलनात एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी व मोंढा व्यापारी असोसिएशनने दिला आहे.
अवैध प्लाॅटींग, अवैध बांधकाम व नवीन रेखांकन मनपाच्या नगररचना विभागाने मंजूर करु नये या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना दिले.
निवेदनात म्हटले आहे बाजार समितीच्या अनाधिकृत बांधकामाला 260 ची नोटीस देऊन सात दिवसांचा वेळ दिला होता. 4 जूनला वेळ संपला तरीही मनपाच्या अतिक्रमण विभागाने कार्यवाही केली नसल्याने आज अक्रामकपणे आंदोलन करण्यात आले. जुना मोंढा हलवून जाधववाडीत हलवला जे रेखांकन जुने होते त्यानुसार उपलब्ध सुविधा कमी होत असल्याने व्यापारावर परिणाम होत आहे. रस्ते अरुंद केली जात आहे. मालवाहतूक ट्रक वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, आडत व्यापा-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असे आंदोलनात विचार व्यक्त करताना नवीन मोंढा व्यापारी असोसिएशनचे व्यापा-यांनी सांगितले.
बाजार समितीच्या रेखांकन मंजुरीच्या विरोधात मनपा व नररचना विभाग यांना अनेक आक्षेप दाखल झालेले आहे. त्याचा न्याय निवाडा अजून झालेला नाही. रेखांकन मंजुरीच्या विरोधात अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. न्याय प्रविष्ट प्रकरणांमध्ये काहींना स्टे , स्टेटसको तर काही प्रकरणात सुनावणी सुरु आहे. अशा विविध मागणीचे निवेदन मनपाला दिले.
यावेळेस एमआयएमचे नासेर सिद्दीकी, युवकचे शहराध्यक्ष मोहंमद असरार, प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, माजी नगरसेवक फेरोज खान, जमीर अहेमद कादरी, आरेफ हुसेनी, हाजी इसाक, विकास एडके, कुणाल खरात, शेख रफीक, व्यापारी असोसिएशनचे राकेश जैन, हरिश पवार, इसा खान, वजीर शहा, मुसा खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






