माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांना पर्यटनात पिएचडी
माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांना पर्यटनातील पीएच डी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शहराचे माजी उपमहापौर प्रमोद प्रल्हादराव राठोड यांना पर्यटन प्रशासन विषयातील पीएच.डी पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. 'अ स्टडी ऑफ सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट इन मराठवाडा रिजन' या विषयावर त्यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला. या संशोधनास त्यांना पर्यटन विभाग संचालक डॉ.माधुरी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमोद राठोड हे विद्यापीठाचे माजी अधीसभा सदस्य असून माजी नगरसेवक आहेत. तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता असून स्मार्ट सिटी संचालक, महानगर नियोजन समिती सदस्य म्हूणनही त्यांनी कार्य केले आहे. या यशाबद्दल प्र.कुलगुरू डॉ. वाल्मिक सरोदे, डॉ. राजेश रगडे यांच्यासह सर्व स्तरातून प्रमोद राठोड यांचे अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?