रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली तर 5 हजार रुपये दंड, कटकट गेटमध्ये कार्यवाही सुरू

रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली तर 5 हजार रुपये दंड, कटकट गेटमध्ये कार्यवाही सुरू
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) शहरातील ट्राफीकची समस्या दूर करण्यासाठी मनपा व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कार्यवाही करत वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत व पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशाने रस्त्यावर, फुटपाथवर, डिवायडरच्या बाजूला आपली वाहने लावली तर पाच हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. कटकट गेट ते पोलिस मेस रोड, रोशनगेट ते आझाद चौक रस्त्यावर अवैध पार्कींगमध्ये उभी असलेली चारचाकी, दुचाकी वाहने चक्क रस्त्यावर उभी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. या रस्त्यावर शादीखाने आहे पण पार्कींग नसल्याने लग्न समारंभात आलेल्या वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने आज सकाळपासून वाहने जप्तीची कारवाई केली जात आहे. एका वेळेस पाच हजार रुपये दंड त्यानंतर दोनदा गाडी जप्त केली तर परत मिळणार नाही असे आदेश दिले आहेत. वाहनधारकांना प्रशासनाने आवाहन केले आहे नो पार्किंगमध्ये गाडी उभी करु नये. रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे आपली वाहने उभी करुन नागरीकांना त्रास देऊ नये. या रस्त्यावर शाळा, दवाखाने, मार्केट असल्याने वर्दळ असते म्हणून रस्त्यावर वाहने लावू नये.
आज झालेल्या कार्यवाहीत 15 ते 20 वाहनांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती वाहतूक विभाग-1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बुधा शिंदे यांनी दिली आहे. मनपाचे नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी वाहनांवर कारवाई केली
.
What's Your Reaction?






