माजी नगरसेवक जावेद हसन खान यांचे निधन

 0
माजी नगरसेवक जावेद हसन खान यांचे निधन

माजी नगरसेवक जावेद हसन खान यांचे निधन

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) सर्वांच्या सुख दु:खात धावून जाणारे, मनमिळावू व्यक्तीमत्व लोटाकारंजा येथील रहीवासी माजी नगरसेवक जावेद हसन खान कासिम हसन खान(अंदाजे वय 65) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. दोनदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. दोनदा काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजकार्य केले. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली. माजी नगरसेवक तकी हसन खान यांचे ते लहान भाऊ होते. निधनाची बातमी कळताच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. त्यांची नमाज-ए-जनाजा बाद नमाज असर शहागंज मस्जिदमध्ये अदा करण्यात आली. दफनविधी लोटा कारंजा येथील कब्रस्तानात करण्यात आला. अशी माहिती त्यांचा मुलगा राफेअ हसन खान यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. त्यांच्या पश्चात 4 भाऊ, पत्नी, एक मुलगा, 5 मुली नाती पोती असा मोठा परिवार आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow