माझ्या मुलाला घाणेरड्या राजकरणात आणणार नाही - इम्तियाज जलिल

 0
माझ्या मुलाला घाणेरड्या राजकरणात आणणार नाही - इम्तियाज जलिल

माझ्या मुलाला घाणेरड्या राजकरणात आणणार नाही - इम्तियाज जलिल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार, महापालिका निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी, निवडणुकीत परफाॅर्मन्स दिला नाही तर घरी पाठवणार... स्वबळावर लढण्याची ताकद फक्त एमआयएम मध्येच...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एमआयएम स्वबळावर लढणार आहे. अशी तयारी सुरू आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची ताकद फक्त एमआयएम मध्येच आहे. आज झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याचा निर्धार करण्यात आला. पदाधिकारी यांनी स्थानिक स्तरावर कोणत्या पक्ष संघटना सोबत जायचे आहे तो त्यांनी ठरवण्याचा निर्णय आज झालेल्या तापडिया नाट्य मंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय आजी माजी पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण मध्ये सुद्धा पक्षाचे काम गेल्या दहा वर्षांपासून कार्यकर्ते काम करत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणूक लढल्यानंतर निकाल लागल्यानंतर विरोधकांना कळेल पक्षाची ताकत किती आहे. राज्यात पक्षांची संख्या वाढली आहे स्वबळावर लढण्याची ताकद कोणत्याही पक्षाकडे नसल्याने महायुती व महाविकास आघाडी होईल परंतु एमआयएम हा एकच पक्ष असा आहे जो स्वबळावर निवडणूक लढतो आहे. एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पदाधिकारी यांना जवाबदारी देणार आहे. निकालानंतर परफाॅर्मन्स बघितले जाईल. वाईट परफाॅर्मन्स दिला तर घरचा रस्ता दाखवला जाईल. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे देणार यासोबतच ज्या नगरसेवकांनी आपल्या वार्डात चांगली विकासकामे केली त्यांचा विचार केला जाईल. प्रभाग पध्दतीने सत्ताधारी पक्षाच्या मर्जीनुसार प्रभाग रचना केली असली तरी मजबुत उमेदवार देऊन आव्हान देण्यात येणार आहे. न डगमगता निवडणुकीला पक्ष सामोरे जाईल. आरोप प्रत्यारोप तर होतच असतात. सर्व जाती धर्मातील मते आता एमआयएमला मिळत आहे. पुढील निवडणुकीत मिळतील असा विश्वास आहे. पक्ष सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना उमेदवारी देणार आहे. महापालिका निवडणुकीत 

प्रभाग पध्दतीने होणा-या निवडणुकीत मॅनेज होणा-यांसाठी हि निवडणूक सोपी राहिलेली नाही. मैदानात जो ताकत दाखवेल तोच उमेदवार टिकणार आहे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. 

राजकारणात पहिल्यासारखे राहिलेले नाही. घाणेरड्या राजकरणात मुलगा बिलालला येवू देणार नाही असे पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी स्पष्ट केले आहे. 

चंद्रकांत खैरे यांना दिपावलीची शुभेच्छा दिल्या यात गैर काय...

आपल्या देशाची संस्कृती आहे. एक दुस-याच्या सणात शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. खैरे हे ईदच्या वेळी मला शुभेच्छा देतात. जेव्हा त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी हिरवा शर्ट घातला होता त्यांना मी म्हटले हा शर्ट तुमच्या अंगावर किती सुंदर दिसत आहे. राजकीय मतभेद असू शकतात पण आम्ही एक दुस-याचे शत्रु नाही. 

पुण्यातील शनिवारवाडा नमाज पठण प्रकरण हे भाजपाच्या राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी उकरुन काढले आहे. पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शेकडो कोटींची जैन हाॅस्टेल जमीन घोटाळा गाजला. भाजपावर टिकेची झोड उठली होती. हे प्रकरण तापले असताना शनिवारवाडा नमाज पठणचे व्हिडिओ व्हायरल करुन माध्यमांचे ध्यान वळवण्यात आले. तेथे बाजूलाच एक प्राचिन दर्गा फार जुनी आहे. येथे जाण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल का...? नमाज पठण केल्याने त्या मुस्लिम महिला शनिवारवाड्याचे मालक झाले का.‌..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणारे असले घाणेरडे राजकारण करुन समाजाला बदनाम करत आहे. एका महीन्याचे व्हिडिओ काढले तर अनेक व्हिडीओमध्ये नमाज पठण दिसेल पण हाच व्हिडिओ वेळ साधून व्हायरल करण्यात आला. असली प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. भाजपाच्या दबावामुळे पोलिसांनी नमाज पठण करणा-या महीलांवर गुन्हा दाखल केला. नमाज पठण करणे इश्वराची भक्ती करणे गुन्हा आहे का....? अशी टिका इम्तियाज जलिल यांनी भाजपावर केली.

बिहारच्या निवडणुकीवर मोठे वक्तव्य...

आमच्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्यासाठी राजकीय पक्ष दुर पळत आहे. गेल्या निवडणुकीत सहा जागा एमआयएमने जिंकली होती. महागठबंधनकडे आम्ही फक्त सहा जागा मागितल्या परंतु काही उत्तर तेजस्वी यादव यांनी दिले नाही. चर्चेसाठी आम्हाला बोलावले नाही. म्हणाले तुमची ताकत नाही. लढू नका असे सांगितले आम्ही काही पक्ष संघनांना सोबत घेऊन 30 जागेवर उमेदवार दिले आहे. महागठबंधनचे नुकसान झाले तर आम्हाला कोसू नका आम्ही सोबत यायला तयार होतो घेतले नाही. निवडणूक लढवायची नाही घरी बसायचे का...असा सवाल इम्तियाज जलिल यांनी विचारला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow