मानवता व एकतेचा संदेश देत जुलूस -ए-मोहंमदी उत्साहात, हिंदू बांधवांनी केले स्वागत
मानवता व एकतेचा संदेश देत जुलूस -ए-मोहंमदीचे आयोजन.....!
पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी केले कमिटीचे स्वागत, संस्थान गणपती, राजा बाजार येथे हिंदू बांधवांनी स्वागत करत मिठाई वाटप...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.19(डि-24 न्यूज) ईद-ए-मिलादून्नबी, जुलूस -ए-मोहंमदी आज सकाळी निजामोद्दीन चौकातून ध्वजारोहण केल्यानंतर प्रारंभ झाला. मानवता व एकतेचा संदेश देत हा जूलूस शहरात शांततेत काढण्यात आला. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी कमिटीचे अध्यक्ष डॉ मुर्तुझा शेख व सदस्यांचे परंपरेनुसार फेटा बांधून स्वागत केले. राजा बाजार, संस्थान गणपती समोर शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने जुलूसचे हिंदू बांधवांनी स्वागत केले. प्रतिष्ठानचे राजिव पिंपळे यांनी सांगितले अनेक वर्षांपासून येथे जूलूसचे स्वागत करण्याची व सहभागी लोकांना मिठाई वाटप करण्याची परंपरा कायम आहे. आमचा उद्देश आहे सर्व जाती धर्मात जातीय सलोखा व भाईचारा कायम राहावे यासाठी पोलीस विभागाचेही नेहमी सहकार्य राहते. यावेळी पोलिस आयुक्त व उपस्थित पोलिस अधिकारी यांनी स्टाॅलवर उभे राहून मिठाईचे वाटप केले. यावेळी पोलिस आयुक्तांनी सांगितले अशाच प्रकारे जातीय सलोखा व भाईचारा कायम राहावे एकता कायम राहिली तर देशाची प्रगती होईल. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला मानवता व चांगले काम करण्याचा मार्ग दाखवला. सर्वांनी मिळून मिसळून सर्व सण उत्सव साजरे केले तर एकजूट राहिल्याने नेहमी देश व शहरात शांतता कायम राहील व देशाचा विकास होईल.
सकाळी 9 वाजता शहागंज येथील हजरत निजामोद्दीन चौक येथून जूलूस मान्यवरांच्या उपस्थितीत निघाला. मुस्लिम समुदायाने 16 सप्टेंबर रोजी जूलूस न काढता 19 सप्टेंबर रोजी काढला म्हणून पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी ईद मिलादून्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, कमिटीचे असदुल्लाह तर्रार, हजरत निजामोद्दीन औलिया दर्गाचे नायब सज्जादा नशिन एड मेहबूब मियां, माजी महापौर रशिद खान मामू, माजी खासदार इम्तियाज जलील, राष्ट्रवादीचे नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय, एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ.शोएब हाश्मी, बोहरा समाजाचे मुकर्रम बागवाला, रजा अकादमीचे हसन रजा, मोहम्मद रजा, युनुस रझवी, बॅ.उमर फारुकी, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे नबी पटेल, शिवनाथ राठी, शहानवाज खान, नुसरत खान, समीर मौलाना, डॉ.अशफाक इकबाल व शेकडो लोकांची उपस्थिती होती.
हा जूलूस दरुद शरीफचे पठन करत शांततेत निजामोद्दीन चौकातून, शहागंज, राजा बाजार संस्थान गणपती नवाबपूरा, जिन्सी चौक, चंपाचौक, शहाबाजार, लोटाकारंजा, बुढीलेन, सिटी चौक, टाऊनहाॅल, जुना बाजार, सराफा, गांधी पुतळा, शहागंज चमन मार्गे निजामोद्दीन चौक येथे समापन करण्यात आले. मार्गावर लोकांनी हार घालून सत्कार केला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले हो
ते.
What's Your Reaction?