मुख्यमंत्री कोण यावर लवकरच निर्णय - देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय म्हणाले

 0
मुख्यमंत्री कोण यावर लवकरच निर्णय - देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय म्हणाले

मुख्यमंत्री कोण यावर लवकरच निर्णय - देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) मुख्यमंत्री कोण याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय जाहीर करतील त्यानंतर मंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल. ईव्हिएमवर विरोधीपक्ष शंका उपस्थित करत आहे या प्रश्नाचे उत्तर देताना माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे तेच माझे उत्तर आहे.

देवेंद्र फडणवीस व अजीत पवार हे दोघेही एका खाजगी कार्यक्रमात शहरात आले होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सुध्दा आज शहरात आले होते त्यांनीही सांगितले 30 नोव्हेंबर अथवा 1 डिसेंबर पर्यंत शपथविधी होईल. महायुतीत काही मतभेद नाहीत ती एकसंघ आहे. मतभेदाबद्दल अफवा पसरवली जात आहे. मुख्यमंत्री कोण आणी उपमुख्यमंत्री कोण लवकरच निर्णय दिल्लीतून घेतला जाणार आहे तो आमचा सामुहिक निर्णय असणार आहे. विरोधीपक्ष हरल्यानंतर ईव्हिएमवर शंका उपस्थित करत आहेत. कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा, केरला, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगालचे निकाल आले तेव्हा ईव्हिएमवर शंका उपस्थित केली नाही. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय म्हणत आहेत ईव्हिएम योग्य आहे मग विरोधीपक्ष आंदोलन करणार असणार तर काय करणार तो त्यांचा प्रश्न आहे. विरोधीपक्षांचा दारुन पराभव जनतेने केला आहे जनताच सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ते रडीचा डाव खेळत आहे. अशी टिका पवार यांनी केली.

शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनावे म्हणून नरेंद्र के साथ अतुलनीय देवेंद्र सरकार अशा आशयाचे मोठमोठ्या होर्डिंग्ज भाजपाच्या वतीने लावले गेले त्याच बाजूला शिंदे सरकार"मराठा सरदार " असे स्लोगन बॅनर वर लिहले आहे तर तिसरे बॅनर गयास बागवान यांनी लावलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री अजित पवार एका लायनित सिल्लेखाना चौकात या मोठमोठ्या होर्डिंग्ज लावण्यात आले आहे

त.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow