मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, पुढची लढाई कशी असणार...!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचे उपोषण मागे...पुढची लढाई कशी असणार...
जालना,दि.14(डि-24 न्यूज) आज पोळ्याच्या दिवशी आंतरवालि सराटी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पित मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मागिल सतरा दिवसांपासून हे उपोषण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, माजीमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपोषणाची सांगता झाली. सातत्याने सरकारचे शिष्टमंडळाने मनधरणी करण्यासाठी जरांगे यांची उपोषणस्थळी भेट देऊन सरकारने जे सकारात्मक निर्णय आरक्षणासाठी घेतले त्याची माहिती देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांची समजूत काढत ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे हि मागणी जरांगे यांची आहे.
सरकारने अपेक्षा पूर्ण करावे आणखी दहा दिवस सरकारला वेळ देतो अशी भूमिका घेतली. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालणार आहे. मी माझ्या बापाचे कष्टाचे खाऊन समाजाचे काम करत आहे. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणूनच दाखवले. अशी भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती केली. त्यांनी समाजाचेही आग्रहाखातर उपचार घेण्यास संमती दर्शवली. सरकारला आम्ही एक महिन्यानंतर एकही फोन करणार नाही त्यांनी युध्द पातळीवर काम करावे व समाजाला न्याय मिळवून द्यावा. गावोगावी शांतपणे साखळी उपोषण शांततेत होणार आहे. अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी बसू पण त्याचा कोणालाही त्रास होणार नाही. अशी भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केली. सरकारने स्थापन केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीमध्ये एक तज्ञ सदस्य देण्यासाठी दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे.
What's Your Reaction?






