मुजीब पटेल अजित पवार गटात, मिळाले प्रदेश सचिव पद
मुजीब पटेल अजित पवार गटात, मिळाले प्रदेश सचिव पद
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात व प्लाॅटींगच्या व्यवसायात अग्रेसर असलेले शहरातील मुजीब उमर पटेल यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सचिवपदी जवाबदारी दिली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजीमंत्री बाबा सिद्दिकी, महाराष्ट्र निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बु-हान, शेख रफीक भाईजी, मोईन जहागिरदार यांनी यावेळी मुजीब पटेल यांनी नियुक्तीबाबत शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?