मुस्लिम व्यवसायिकांना कानिफनाथ यात्रेत बंदी घातलेला ठराव अखेर रद्द, गटविकास अधिकाऱ्यांनी ठराव असंवैधानिक म्हटले...

 0
मुस्लिम व्यवसायिकांना कानिफनाथ यात्रेत बंदी घातलेला ठराव अखेर रद्द, गटविकास अधिकाऱ्यांनी ठराव असंवैधानिक म्हटले...

कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी, ग्रामपंचायतचा ठराव ठरवला रद्द....

 गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, ग्रामसभेतील 'तो' ठराव केला रद्द

पाथर्डी, दि.1 पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्‍यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्‍यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आता पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आला आहे. 

कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा असून महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. पारंपारिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेल लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. तसेच पलंग आणि गादीचा देखील वापर करत नाहीत. मात्र यात्रेतील मुस्लीम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते, त्यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी येथील ग्रामसभेत करण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

गटविकास अधिकाऱ्यांनी ठराव केला रद्द...

यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ठरावाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समितीने नोंदवले आहे. चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी पाठविला असून मुस्लीम व्यवसायिकांना यात्रेत बंदी केल्याचा ठराव नियमबाह्य ठरवत रद्द करण्यात आला आहे. 

नितेश राणे देणार मढी येथे भेट देणार...

आज शनिवारी मढी येथे राज्याचे मंत्री नितेश राणे हे भेट देणार आहेत. या दरम्यान काही चिथावणीखोर वक्तव्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही यात्रा शांततेत व्हावी यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर, मढीतील मुस्लीम व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून मढीतील यात्रा शांततेत पार पाडावी, अशी मागणी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow