मोदींच्या मंगळसूत्रावरील विधानावर ओवेसींचा हल्लाबोल, ठाकरे, पवारांवर निशाणा

 0
मोदींच्या मंगळसूत्रावरील विधानावर ओवेसींचा हल्लाबोल, ठाकरे, पवारांवर निशाणा

मोदींच्या मंगळसूत्रावरील विधानावर ओवेसींचा हल्लाबोल, ठाकरे, पवारांवर निशाणा...!

खंजिर इंडिया आघाडीने खूपसला एमआयएमने नाही, तुमचे उपकार फेडण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे दिले उत्तर, मंगळसुत्राच्या विधानावर व घुसपैठी म्हणाल्याने मोदींवर बरसले ओवेसी, इम्तियाज जलील खासदार झाल्यानंतर खैरे झाले सेक्युलर, भुमरेंना झुम...रे म्हणून हिणवले... मुस्लिम मतांवर ठाकरेंचा डोळा असल्याचा केला आरोप...

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना घुसपैठी, मुस्लिम महीलांना जास्त मुले जन्माला घालतात, काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदू महीलांचे मंगलसुत्र हिसकावून मुसलमानांना संपत्ती व सोने, मालमत्ता वाटून टाकतील असा भय हिंदूंमध्ये निर्माण केला. 130 कोटी जनतेचे पंतप्रधान यांच्याकडून अशी देशाला अपेक्षा नाही अशी भाषा ते वापरत आहे. असे म्हणत एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी ऐतिहासिक आमखास मैदानावर आयोजित सभेत मोदींचे ते भाषण ऐकवले आणि अक्रामक होत मोदींवर हल्लाबोल केला. 

इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत बोलताना ओवेसींनी सांगितले रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2019 ते 2024 पर्यंत देशातील महीलांनी कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी एक लाख कोटींचे सोने गिरवी ठेवले हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे की देशातील महीलांचे मन किती मोठे आहे. देशातील मुस्लिम तुम्हाला असे वाटतात की ते हिंदू भगिनींचे मंगळसूत्र हिसकावतील. देशातील मुसलमान तुम्हाला घुसपैठी वाटतात का थोडे तरी विचार करुन बोलत जा तुम्ही एका जवाबदार पदावर बसलेले आहेत.

इंडिया आघाडीवर सुध्दा ओवेसींनी निशाणा साधला. त्यांनी सांगितले राज्यातील 48 जागेमधून एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. 47 जागेची विजयाची चिंता न करता सर्व पक्ष इम्तियाज जलील यांना निवडणूकीत पाडण्यासाठी एकत्र येत आहे. सेक्युलर मतांवर निवडून येणारे पक्षांना मुस्लिम मते चालतात पण मुस्लिम उमेदवार चालत नाही असे विधान काँग्रेस नेते करत आहे. उध्दव ठाकरे सेक्युलर झाले तरी ते मुस्लिम उमेदवार देत नाही तर त्यांनाही मुस्लिम मतांची आज गरज वाटत आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची भेटली व मुलाचे राजकीय भवितव्यासाठी कुठेही जाऊ शकतात असा टोला ओवेसींनी आपल्या भाषणात लगावला. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस इम्तियाज जलील यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु एम आय एम सोबत हिंदू, मुस्लिम, धनगर, शिख, ख्रिश्चन आता एकत्र आले आहे म्हणून 13 मे रोजी फक्त पतंग चालणार आहे. 

त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका शेरने केली.

ते म्हणाले " फुल नफरत का हम महाराष्ट्र के चमन मे खिलने नहीं देगे, तीर अदावत का मशाल की आग अपनी बस्तियो मे चलने नहीं देंगे, नौजवान, बुजूर्ग, माँ बहेने औरंगाबाद के दलालो को नेता नहीं बनने देंगे."

पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी सांगितले सिएए, ट्रीपल तलाक, समान नागरी कायदा, युएपिए कायद्याला पाठिंबा दिला होता. एनआरसी एनपिआरला आला तर ते वाचवण्यासाठी येणार का...? असा प्रश्न उपस्थित केला. एकमेव एमआयएम असा पक्ष आहे सरकारच्या चुकीच्या निर्णयावर न घाबरता संसदेत बोलतात ते मी आणि इम्तियाज जलील आहे. सिएए एनआरसी कायदा संसदेत फाडला होता अशी हिंमत काँग्रेस व अन्य सेक्युलर पक्षाचे खासदार दाखवत नाही. इम्तियाज जलील यांनी मराठा व धनगर आरक्षणावर आवाज उठवला. आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यातील गुंतवणूकदारांसाठी आंदोलन केले. ते एका समाजाचे नेते नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. म्हणून त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी एकजूट होऊन मतदान करा. मतांचे विभाजन होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहन मतदारांना केले.

यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

व्यासपीठावर इम्तियाज जलील यांना पाठिंबा देणारे साहेबखान पठाण, शेख मोहसीन, खान एजाज अहेमद व एक अन्य उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतल्याने ओवेसींनी त्यांचा सत्कार केला.

इम्तियाज जलिल यांनी विरोधकांवर आपल्या भाषणात प्रहार केला. आपल्या भाषणाचा वेळ त्यांनी ओवेसींना देत आपले भाषण आटोपले. बिहार किशनगंजचे उमेदवार अख्तरुल इमान, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवकचे अध्यक्ष मोहम्मद असरार, फिरदौस फातेमा रमजानी खान व सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. हाफीज असरार यांनी सुत्रसंचलन केले.

खैरेंवर सडकून टीका...

ओवेसी म्हणाले 2019 मध्ये एकजूट दाखवून इम्तियाज जलील यांना निवडून आणले याचा परिणाम असा झाला की चंद्रकांत खैरे इदगाहवर शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यानंतर मुस्लिम समाज पाच वेळा नमाज पठण करतात. त्यांनंतर फुंकर मारल्याने आजार बरा होतो असे म्हणतात. मुस्लिम मतांसाठी असले विधान ते करत आहेत. त्यांनी सांगावे अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर गुन्हा दाखल आहे किंवा नाही. असे असताना खैरे आता सेक्युलर कसे झाले असा सवाल ओवेसींनी विचारला. आम्ही तर संसदेत बाबरी मशीद जिंदाबाद बोलतो अशी टिका त्यांनी केली. खैरे भुमरेंवर सुध्दा त्यांनी निशाणा साधला. भुमरेंना घुम....रे म्हणत त्यांनी हिनवले. 

एड आंबेडकर यांना दिले उत्तर....

काल झालेल्या आमखास मैदानावर एड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात ओवेसींनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला होता. त्यांना उत्तर देताना ओवेसींनी सांगितले आम्ही नाही तर काँग्रेसने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. बैठकीत बोलावले, चर्चा झाली, इंडिया आघाडीच्या कार्यक्रमात बोलावले तरी सोबत घेतले नाही. आम्हाला तर इंडिया आघाडीने सोबत घेतले नाही कारण त्यांना दुसऱ्या समाजाची मते मिळणार नाही याचा धाक आहे असे एका नेत्याने सांगितले त्यांचे उदाहरण सभेत त्यांनी दिले. 

इम्तियाज जलील यांनी केलेल्या कामांच्या पुस्तिकेचे विमोचन यावेळी

ओवेसींनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow