मोहम्मद एजाजला कोर्टाचा झटका, दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला...!
मोहम्मद एजाजला कोर्टाचा झटका,
जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- जालननगर प्लॉट फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज
याचा जमीन अर्ज
न्यायल्याने दुसऱ्यांदा
फेटाळल्यामुळे हर्सूल कारागृहातील त्याचा मुक्काम आणखी वाढला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि मोहम्मद एजाज मोहम्मद रियाज आणि त्याच्या इतर 4 साथीदारा विरुद्ध 3 एप्रिल 2026 रोजी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अधिनियम 338, 336(1), 318(3), 340(2), 61(2), 3(5) अन्वय गुन्हा दखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडी अंतर्गत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
जमीन मिळविण्यासाठी मोहम्मद एजाज याने यापूर्वी ही न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता.
या निर्णयामुळे मोहम्मद एजाज यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून, त्यांना तातडीचा कोणताही दिलासा मिळालेला नाही. आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांमुळे आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मोहम्मद एजाज मो रियाज यांनी जामीनासाठी मुख्य न्यायीक दांडाधिकारी के. एम. कायगुडे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्यांचा अर्ज नामंजूर केला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीला जामीन दिल्यास तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले, तसेच पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला.
What's Your Reaction?