या निवडणुकीत तीन लाडक्या बहीणी विधानसभेतून कमी झाल्या...!

 0
या निवडणुकीत तीन लाडक्या बहीणी विधानसभेतून कमी झाल्या...!

राज्य विधानसभेत 21 नवनिर्वाचित महिला झाल्या आमदार

मुंबई, दि.24(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले.

तथापि, नवनिर्वाचित महिला आमदारांची संख्या 2019 मध्ये निवडून आलेल्या सध्याच्या 24 वरून यावेळी 21 वर आली आहे. या विधानसभेत या निवडणुकीत तीन लाडक्या बहीणी कमी झाली असल्याची स्थिती आहे.

महायुतीची सत्ता पुन्हा आली हा सगळा चमत्कार 'लडकी बहीन' योजनेमुळे घडल्याचा दावा विजयी पक्षांकडून केला जात आहे.  एकीकडे लाडकी बहिन योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे महिला उमेदवारही नाकारल्याचे चित्र आहे. 

यंदा या विधानसभा निवडणुकीत एकूण 4136 उमेदवार रिंगणात होते.  त्यापैकी सुमारे 250 महिला उमेदवार होत्या.  म्हणजे एकूण उमेदवारांपैकी केवळ सहा ते सात टक्के महिला उमेदवारांनाच संधी मिळाली.  आता निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्या केवळ 7 टक्के आहे.

23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत 250 पैकी केवळ 21 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

 त्यात भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेल्या 14 महिला उमेदवार आहेत.  यामध्ये चिखलीतून श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजळे यांचा समावेश आहे. केज मधून मुदंडा,  भोकरमधून श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईममधून स्नेहा पंडित, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण यांनीही यंदा दणदणीत विजय मिळवला. मराठवाड्यातून पाच महीला उमेदवार निवडून आले आहे. यामध्ये चार भाजपाचे व एक शिंदेसेनेतून निवडून आले आहेत.

      साक्रीमधून मंजुळा गावित, कन्नडमधून संजना जाधव या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पक्षातून निवडून आल्या. 

   तर, अणुशक्तीनगरमधून सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली) आणि सना मलिक आणि श्रीवर्धनमधून आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) विजयी झाल्या आहेत.

तर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने 10 महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती.  मात्र एकही महिला उमेदवार विजयी झाला नाही.

धारावी मतदारसंघातून काँग्रेसच्या एकट्या महिला उमेदवार डॉ .ज्योती गायकवाड विजयी झाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow