रमाई घरकुल योजनेत शंभर कोटींचा घोटाळा...? - इम्तियाज जलिल

रमाई घरकुल योजनेत शंभर कोटींचा घोटाळा...? - इम्तियाज जलिल
मनपात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेऊन केली चर्चा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्याकडे केली चौकशीची मागणी, बोगस लाभार्थी दाखवून पैसे लागल्याचा केला आरोप...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)
चांगल्या उद्देशाने शासनाने गरीबांना घरे बनवण्यासाठी हि योजना सुरु केली. पण मनपात दलाल व मनपाच्या काही अधिका-यांच्या संगनमताने गेली चार वर्षांत शंभर कोटींच्या जवळपास घोटाळा झाला असल्याची माहिती एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिली आहे.
त्यांनी एक उदाहरण असे दिले कि जगात अशी टेंडर प्रोसेस एजंसी नियुक्त करताना घडले कोठेही होत नसेल. लाभार्थ्यांची निवड व विविध प्रक्रीये साठी समाजाचे काम म्हणून 90 टक्के Below वर काम एजन्सीने घेतले. दोन माजी नगरसेवक या योजनेत काम करत आहे. अधिका-यांना टक्केवारी देऊन दुस-या गावातील लाभार्थ्यांच्या नावाने, एकच घरातील चार व्यक्तींना अडीच लाखांचे अनुदान बोगस कागदपत्रे सादर करुन लाटले जात आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदिप कांबळे व संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी तक्रार देऊन केली आहे. निष्पक्ष चौकशी झाली तर शंभर कोटींहून अधिक घोटळा उघड होईल. रमाई आंबेडकर यांचे नाव सर्व आदराने घेतात परंतु त्यांच्या नावावर सुरु असलेल्या योजनेत भ्रष्टाचार करणा-या नेत्यांना लाज वाटली पाहीजे अशी टिका त्यांनी केली आहे. माझ्याकडे या घोटाळ्याचे सर्व पुरावे आहेत ते पुरावे पत्रकार परिषदेत काही दिवसांनंतर आणून जनतेसमोर पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






