रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांना करावा लागला रस्ता रोको आंदोलन...!

 0
रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांना करावा लागला रस्ता रोको आंदोलन...!

भाजप नगरसेवकांना रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी करावा लागला रस्ता रोको आंदोलन...

वरद ते सिग्मा हॉस्पिटल रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना हटविले... काही दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीत अडकली होती रुग्णवाहिका...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- महानगरपालिका निवडणुकीत बहुमताने सत्ता स्थापन केलेल्या भाजपाच्या नगरसेवक व नगरसेविकांच्या नातेवाईकांना शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी रास्ता रोको करावा लागल्याची घटना सोमवारी शहरात घडली. या आंदोलनामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग रस्त्यावर लागल्याने वाहतूक जाम झाली होती. माहिती मिळताच पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने घटनास्थळी धाव धाव घेत, वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावरील भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. या आंदोलनामुळे सोमवारी दिवसभर रस्ता मोकळा होता. विकेत्यांची सोयी शहानूरमिया दर्गा परिसरातील मनपाच्या गाळ्यांमध्ये करावी, रस्ता कायम मोकळा राहील, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूंनी भाजीपाला, फळ विक्रेते आपली दुकाने थाटत आहेत. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना, तसेच परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विक्रेत्यांच्या गाड्या तसेच खरेदीसाठी थांबलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वारंवार कारवाई केल्यानंतरही याठिकाणी दुतर्फा रस्त्यावर हातगाड्या, वाहने उभी करून व्यवसाय केला जातो. काही जणांनी तर पाल ठोकून जागेचा अनधिकृत ताबा घेतला आहे. ही अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांच्यासह नागरिकांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याने जवाहनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी पथकासह धाव घेतली, आंदोलनकर्त्यांची समजूत काढत अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन दिले. नगरसेविकांनीही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली. त्यानंतर अतिक्रमण पथकाने जावून कारवाई करत, विक्रेत्यांचे भाजीपाला, हातगाड्या, साहित्य जप्त केले. यावेळी विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. यापुढे अतिक्रमणे होऊ नयेत, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, अन्यथा पुढील आंदोलन दर्गा चौकात करण्यात येईल'', असा इशारा शौलेंद्र नीळकंठ, प्रदीप बुरांडे यांच्यासह नागरिकांनी दिला.

भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांच्यासह काही नागरिक अतिक्रमणधारकांना समजावण्यासाठी गेल्या असता, भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांना अरेरावी केली. आम्ही असे खूप नगरसेवक पाहिले आहेत, असे सुनावले. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow