राखी पोर्णिमेपूर्वी पगार न दिल्याने केले भिक मांगो आंदोलन...!
राखी पोर्णिमे पूर्वी पगार न देणाऱ्या सरकारला भिक द्या आंदोलन करुन निषेध
आयटकचे घाटीत भिक मांगो आंदोलन !
162 रुपये जमा भिक शिंदेंना मनी ऑर्डरने पाठवली !
छ. संभाजीनगर (औरंगाबाद ) दि.18(डि-24 न्यूज)
राखी पोर्णिमेपूर्वी मागच्या महिन्याचा पगार आज 18 तारखेपर्यंत दिला नाही , म्हणून महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने भिक मांगो आंदोलन करून 162 रुपये भीक जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनी ऑर्डरने पाठवले.
याबाबत असे की दर महीन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार दिला पाहिजे असा कायदा असतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात औरंगाबाद येथील कथित कंत्राटी कामगारांचा पगार महिन्याच्या 18 तारखेपर्यंत ही झालेला नाही. लाड़की बहीण भाऊ योजना आणली उद्या राखी पोर्णिमा आहे. घाटी हॉस्पीटल मधील कथित कंत्राटी कामगार भावांनी उद्या बहिनींना ओवाळनी कशी टाकावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड योध्दांना सेवेत सामावून घेणे त्यांना कीमान वेतन देणे तर दूरच पण 8 हजार रुपये पगार देतात तेही वेळेवर देत नाहीत. घरमालकाला घरभाडे कसे द्यावे, किराणा दुकानदार देखील उधारी देत नाही. शिक्षण आणि औषधांचा खर्च तर लांबच राहीला. असंवेदनशील सरकारला कोविड योद्धांची काळजी वाटत नाही असा आरोप देखील महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सचिव ॲड अभय टाकसाळ यांनी केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालय आरएमओ ऑफीस समोर 2 रुपये, 5 रुपये, कुणी 10 रुपये असे तब्बल 162 रुपये भिक जमा झाली. या आंदोलनामुळे या कोविड योध्दांना सरकारने सेवेत सामावून घ्यावे, त्यांचे पगार वेळेवर करावे, अशी भावना उपस्थित कामगार बंधू भगिनींनी व्यक्त केल्या यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रतिसाद देत तब्बल 162 रुपये अर्ध्या तासात भिक दिली. भिकेची रक्कम सर्वा समक्ष मोजून मनिऑर्डर द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली. या आंदोलनात ॲड अभय टाकसाळ , राजू हिवराळे, विकास गायकवाड, आतिश दांडगे, अभिजीत बनसोडे, गौतम शिरसाठ, श्रीयोग वाघमारे, शिला मूजमुले, विद्या हिवराळे, सविता घागरे वंदना बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
What's Your Reaction?