राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावे - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय
प्रतिनिधी नेमावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) -मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमणूक करावी. त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज केले.
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांच्या अनुषंगाने आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधर व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी अचूक व पारदर्शक असण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मतदार यादीचे पुनरिक्षण ही प्रक्रिया वर्षातून एकदा होत असली तरी मतदार यादी अद्यावत करणे ही निरंतर प्रक्रिय निरंतर असते. त्यासाठी प्रत्येक यादी भागासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी राजकीय पक्षांनी नेमावे. जेणे करुन मतदार यादीच्या पारदर्शकतेबाबत राजकीय पक्षांना अधिक माहिती मिळू शकेल. तरी सर्व राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधींची नावे द्यावी. हे प्रतिनिधी कोणत्याही शासकीय वा शासकीय अनुदानित संस्थेशी संबंधित नसावे. ते त्याच भागातील रहिवासी असावे, त्यांचे नाव त्याच मतदार यादीत असावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सादरीकरण करण्यात आले व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्याबाबत माहिती देण्यात आली. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसनही जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.
What's Your Reaction?