राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदी फैसल मुजावर...!
राष्ट्रवादीच्या ओबीसी औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष पदी फैसल मुजावर ची नियुक्ती.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या ओबीसी विभागाकडून औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी फैसल मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र ओबीसी विभाग चे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या सही ने देण्यात आले.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या सूचनेनुसार राज्यभर ओबीसी संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच समाजातील ओबीसी प्रवर्गातील सर्व घटकांना संघटन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने 30 एप्रिल 2026 पर्यंत या नियुक्त्या पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित माहिती व्हॉट्सअॅप किंवा पोस्टद्वारे पक्ष कार्यालयात पाठविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, जिलाध्यक्ष पांडुरंग तायडे पाटिल, औरंगाबाद शहर अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन, राष्ट्रीय उपाध्यक्ष वीणा ताई खरे, ओबीसी राज्य समयवंक आसिफ खलीफे, सलीम बेग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी, मराठवाड़ा अध्यक्ष ओबीसी जीतेंद्र अटक, संजय दूधगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद लईकोद्दीन यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?