आंबेडकर नगर परिसरात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज...!
आंबेडकर नगर परिसरात नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - आंबेडकर नगर येथे पिण्याच्या पाण्यात ड्रेनिजचे पाणी, नागरिक आजारी पडत आहे महानगरपालिकेची दुर्लक्ष असल्याची तक्रार दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांनी केले आहे. प्रभागातील नगरसेवकांनी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. आंबेडकर नगर एन-7 सिडको ही वसाहत 20 वर्षापासून जळगाव रोड पूर्व बाजूस वसली आहे. महानगरपालिका या वसाहतीला सुविधा पुरविते, टॅक्स घेते परंतु 40 वर्षांपूर्वीची ड्रेनेज लाईन जुनी झाली आहे ती बदलत नाही त्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात निचरत असून सर्व नागरिक आजारी पडत आहेत. याकडे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून 40 वर्ष पूर्वीची जुनी ड्रेनेज लाईन बदलून नवीन टाकून द्यावी व ड्रेनेज मेन होल भरले आहेत ते नेहमी भरत आहेत ती समस्या एकदा तात्काळ दुरुस्त करावी जेणेकरून आठ दिवसाला येणारे पिण्याचे पाणी थोडेफार चांगले येईल अशी मागणी भारतीय दलित पॅंथर व नागरिकांच्या वतीने मनपाकडे करत आहोत.
अनेक वेळा ड्रेनेची पाईपलाईन बदलण्यात यावी नागरिकांना आठ दिवसाला येणारे पिण्याचे पाणी स्वच्छ यावे कोणीही आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी व पॅंथरला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असा इशारा प्रसिध्दीपत्रकात त्यांनी दिला आहे.
प्रसिध्दीपत्रकात पँथर नेते लक्ष्मण दादा भुतकर, धम्मापाल दांडगे, सिद्धार्थ बोर्ड, दशरथ कांबळे, पार्वती घोरपडे, कलावती गवई, कल्पना गायकवाड, रेखा गायकवाड, सुनीता शिंदे, स्वाती प्रधान व डॉ.आंबेडकर नगर वसाहतीतील नागरिकांची नावे प्रसिध्दीपत्रकात
आहे.
What's Your Reaction?