सिल्लोडमध्ये प्रेरणादायी उपक्रम, सहावीची विद्यार्थीनी बनली एका दिवसासाठी पोलिस निरीक्षक...!
सिल्लोडमध्ये प्रेरणादायी उपक्रम; 6 वीची विद्यार्थ्यीनी बनली ‘एका दिवसासाठी पोलीस निरीक्षक’
सिल्लोड, दि.26(डि-24 न्यूज)- शहरात रविवारी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला. मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू शाळेतील 6 कक्षेत शिकणारी अदीबा इरफान कुरेशी
हिने सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात एक दिवसासाठी पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
या उपक्रमांतर्गत अदीबाला पोलीस विभागाच्या कामकाजाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची माहिती घेणे, अधिकाऱ्यांशी संवाद साधणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती तिने जाणून घेतली.
अदीबाला मोठे झाल्यावर पोलिस निरीक्षक बनण्याची इच्छा आहे ती इच्छा तीने आपल्या पालकांना बोलून दाखवली व पोलिस ठाण्यात जाऊन कामकाजाची माहिती घेण्यासाठी सांगितले. पालकांनी शहरातील प्रतिष्ठित लोकांसोबत चक्क पोलीस ठाणे गाठून कामकाजाची माहिती घेतली याबद्दल मुलीचे कौतुक होत आहे.
अदीबाने आत्मविश्वासाने आपली भूमिका पार पाडत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मने जिंकली. तिच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले.
या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशासनिक सेवांविषयी जागरूक करणे आणि भविष्यात जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरित करणे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्याची जाणीव वाढते आणि समाजाबद्दलची समज अधिक दृढ होते.
अदीबासाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
What's Your Reaction?