राष्ट्रवादीसाठी शहरातील तीन मतदारसंघात 35 उमेदवार इच्छुक
राष्ट्रवादीसाठी शहरातील तीन मतदारसंघात 35 उमेदवार इच्छुक
छ.संभाजीनगर(औरंगाबाद),दि.11(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीन विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून 35 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहे. भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती डि-24 न्यूजला शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी दिली आहे.
पक्षाच्या वतीने 10 सप्टेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून मुश्ताक अहमद, छायाताई जंगले, जलील अहेमद खान, विठ्ठलराव जाधव, सलिम पटेल वाहेगांवकर, अजितसिंग छतवाला यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, मुश्ताक अहमद, मेहराज इसाक पटेल, कैसर खान, उल्हास नरवडे पाटील, जलिल अहेमद खान, शेख अयूब पटेल, औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून विनाताई खरे, राजेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरले असे बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख( मुन्नाभाई) व प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान यांनी कळविले आ
हे.
What's Your Reaction?