रिक्षाचालकांनी वाहतूक शिस्तीचे पालन करावे नसता कारवाई होणार...!

रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासन सज्ज परंतु रिक्षा स्टँड कागदावर त्याचे काय
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) स्मार्ट सिटीत रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन व रिक्षा चालक मालक संघटना सोबत बैठक झाली यामध्ये अनेक निर्णय वाहतूकीसंदर्भात घेण्यात आले. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक पोलिस आयुक्त कार्यालयात संपन्न झाली.
रिक्षाचालकांनी नियमांचे
पालन करावे असे आदेश यावेळी बैठकीत पोलिस आयुक्तांनी दिले आहे. रिक्षाचालकांनी बैठकीत विविध प्रलंबित मागण्या सोडवण्याची विनंती केली आहे. शहरात शंभर रिक्षा स्टँड होते त्यापैकी 50 गायब झाले रिक्षा कोठे लावायची हा प्रश्न आहे. रस्त्यावर रिक्षा उभी केली तर ऑनलाईन दंडाची पावती मिळते. दिडशे रिक्षा स्टँड मंजूर आहे परंतु ते आतापर्यंत कागदावरच आहे. मनपाने स्मार्ट रिक्षा स्टँड बनवून द्यावे अशी मागणी केली आहे. रिक्षाचालक पैसेंजर यांना जबरदस्तीने हात पकडून रिक्षात बसवतात अशी जबरदस्ती करू नये. रिक्षाचालकांनी अमली पदार्थ अथवा कोणत्याही प्रकारची नशा न करता रिक्षा चालवावी. सभ्यपणे वागणूक द्यावी. रिक्षाचालकांनी रिक्षा चालवताना गणवेश परिधान करून परवाना असल्याशिवाय रिक्षा चालवू नये. गणवेशावर बॅच लावणे बंधनकारक आहे. रिक्षाचे उजव्या बाजूचा दरवाजा कायमस्वरूपी बंद ठेवणे आवश्यक आहे. रिक्षा थांबा वरच रिक्षा उभी करावी. रस्त्यावर अथवा चौकात रिक्षा उभी करु नये. पाठीमागिल रहदारीचा विचार करून रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवून प्रवाशांची चढ उतार करावी. रिक्षाचे पाठीमागिल फाटक बंद ठेवावे पाठीमागे प्रवाशांना बसवू नये. रिक्षाचे नंबरची खाडाखोड करु नये नंबर झाकून ठेवू नये. ओव्हरसिट व फ्रंट सिटवर प्रवासी बसवू नये. सिग्नलचे व वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल असा इशारा बैठकीत देण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक मालक यांना हक्काचे स्मार्ट रिक्षा स्टँड द्यावे. ई-रिक्षालाही नियम लावण्यात यावे. पेट्रोल, एलपीजी, सिएनजी रिक्षांना नियममुक्त करावे. प्रिपेड रिक्षाची अंमलबजावणी कधी सुरू होईल. दर फलक लावा किंवा रेट कार्ड द्यावे. सिध्दार्थ गार्डन समोर सरकता जिना स्मार्ट सिटीच्या अंतर्गत लावावे. रेल्वेस्टेशन गेटवर सरकता जिना लावले तर तेथील गर्दी कमी होईल. शहरातील जुने व नविन रिक्षा स्टँडचा सर्वे करून स्मार्ट रिक्षा स्टँड तयार करून द्यावे अशी मागणी रिक्षाचालक मालक महासंघाने केली आहे.
या बैठकीत पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा सचिन इंगोले, अमोल देवकर, राजेश मयेकर, विवेक जाधव व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील काही रिक्षा स्टँड गायब झाले अथवा तेथे अतिक्रमण झाले बुढीलेन येथील रिक्षा स्टँडचे छायाचित्र या बात
मीत.
What's Your Reaction?






