रिक्षाचे नुतनीकरण विलंब शुल्क प्रति दिन 50 रुपये, दंड रद्द करण्याची रिक्षाचालक महासंघाची मागणी
परवानाधारक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विलंब शुल्क भरावे लागणार , रिक्षाचालकांची रद्द करण्याची मागणी
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) परवानाधारक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी उशीर झाला तर प्रती दिन 50 रुपये दंड भरावा लागणार असल्याने वाहनधारकांना हे न परवडणारे आहे. ऑटो रिक्षाला सुध्दा हा दंड भरावा लागणार आहे. रिक्षाचे नुतनीकरण करण्यास लावलेला विलंब शुल्क रद्द करण्यात यावे. दर महिन्याला 50 रुपये विलंब शुल्क घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. इंधनाचे, LPG, CNG व रिक्षाचे सुटेभागही महाग झाल्याने रिक्षा चालक मालकांना उदरनिर्वाह करणे कोरोनापासून कठीण झाले आहे. व्यवसाय ही डबघाईस आले आहे. ऑटो रिक्षाची प्रवासी वाहतूक कमी उत्पन्न गटात येते. विलंब शुल्क हे जाचक आहे व ते जड वाहतूकदारांविषयक आहे. जड वाहतूकदार न्यायालयात गेले होते. तरी ऑटोरिक्षा नुतनीकरण विलंब शुल्क रद्द करण्याचे मागणीचे निवेदन आज शिष्टमंडळाने खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी आश्वासन दिले की आचारसंहिता संपल्यानंतर हा विषय संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मांडण्यात येईल असे आश्वासन दिले.
रिक्षा चालक मालक संघटनेने लोकसभा निकालानंतर मोठे आंदोलन राज्यात उभे करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान, कैलास शिंदे, प्रकाश हेगडे, भिसन धोदे, साहेबराव साबळे, एस.के.अखिल, मो.फारुख, मोहम्मद बशीर, एम.डी.फारुख आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?