रिक्षा चालक मालक संघटनांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात...

 0
रिक्षा चालक मालक संघटनांचे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात...

ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू, उद्या बैठक 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- ऑटो रिक्षा चालक व मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव बालाजी आढे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून संघटनेने विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

ऑटो रिक्षाच्या एलपीजी गॅस 125 वरुन ते पूर्ववत 62 रुपये दरात कपात करून तो पूर्वीप्रमाणे कमी करण्यात यावा.

अवैध कंपनी ट्रान्सपोर्ट प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ बंदी घालावी.

धर्मवीर आनंद दिघे साहेब मिटर्स टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी योजनेची फि माफी करून परवानाधारकांना लाभ द्यावा.

ई-रिक्षांसाठी योग्य परवाना व पोलिस पडताळणीचे नियम लागू करावेत.

बाईक टॅक्सी व अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी.

शहरात रिक्षांसाठी अधिकृत पिक-अप व ड्रॉप पॉईंट निश्चित करावेत.

रिक्षा चालकांवर आकारण्यात आलेले दहा हजार ते एक लाख पर्यंत ई-चालान दंड रद्द करावेत.

महिला सक्षमीकरणासाठी‘पिंक रिक्षा’ योजनेत पुरुष चालक आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

इतर जिल्ह्यांतील रिक्षांना स्थानिक व्यवसायात अनधिकृत प्रवेश रोखावा.

संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, मागण्या तात्काळ मान्य न केल्यास उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रसंगी बालाजी आडे(सरकार), निसार अहमद खान, एड अभय टाकसाळ, मोईनोद्दीन इनामदार, सुरेश जाधव, इम्रान पटेल, मोहम्मद फारुख मेमन, नाहीद फारुकी, प्रकाश हेगडे, दिपक पाटील, बिसेन लोधे, शेख अमजद, शेख अखिल, शेख खलील, अज्जू लिडर उर्फ रशीद खान, कैलास शिंदे, राजेश महारगुळे, अली सिकंदर, गजानन वानखेडे व मोठ्या संख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow