रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन...!

 0
रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन...!

रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर, दि.11, (डि-24 न्यूज)-छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिससमोरील एस.बी.आय. एटीएम लगत एक अनोळखी इसम आज बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.

या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

वय अंदाजे 50 वर्षे रंग, सावळा,नाक बसके

 केस काळे, पोशाख, काळसर रंगाची पँट घातलेली असून 

या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाकडे काहीही माहिती असल्यास, त्यांनी तत्काळ वेदांत नगर पोलीस ठाण्याशी किंवा सहायक फौजदार व्हि. के. चव्हाण यांच्याशी 976717110 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow