रोशनगेट गिरनी मैदानाचे करणार विकास, शहर नशामुक्त करणार - पालकमंत्री अब्दुल सत्तार

 0
रोशनगेट गिरनी मैदानाचे करणार विकास, शहर नशामुक्त करणार - पालकमंत्री अब्दुल सत्तार

रोशनगेट गिरनी मैदानाचे करणार विकास, शहर नशामुक्त करणार - पालकमंत्री अब्दुल सत्तार

किराडपूरा मनपा शाळेच्या मैदानात बनणार टर्फ खेळाचे मैदान, या मैदानावर अवैध नशा करण्यासाठी वापर होत असल्याने समाजसेवक ओसामा अब्दुल कदीर मौलाना यांच्या प्रयत्नातून मनपा प्रशासकांनी कायापालट करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) शहरातील नागरिकांनी संकल्प केला तर शहराला नशा मुक्त करु शकतात. ज्या भागात अवैध नशेची विक्री होत असेल त्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी इशारा दिला आहे. मुले शिक्षण घेऊन भविष्य बणवण्यासाठी त्यांना शैक्षणिक व खेळाचे मैदान मिळाले तर प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शहरातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मनपा प्रशासक जी श्रीकांत प्रमाणिक प्रयत्न करत आहे. उर्दू शाळा असो किंवा मराठी त्यांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांची तळमळ आहे. ते झोपडपट्टीतील शाळेत शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी बनले हा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावे. किराडपूरा मनपा शाळेच्या मैदानात आज विविध खेळासाठी मैदानाचे उद्घाटन झाले त्या मैदानावर खेळाडूंना भविष्यात नक्की फायदा होईल. मी पणनमंत्री पण आहे. रोशन गेट येथील मैदानावर खेळाच्या मैदानाचे विकास करण्यासाठी मनपाने पाठवावे. न्यायालयीन व तांत्रिक समस्या सोडवून तेथे भव्य खेळाचे मैदान बनला तर खेळाडूंना अधिक फायदा होईल. 

आगामी विधानसभा निवडणुकीत मी 1 लाख 40 हजार मतांच्या लिडने निवडून येईल. संदीपान भुमरे यांना खासदार बणवून दिल्लीत पाठवले तरच मी पालकमंत्री बनलो. मला माहित आहे कोणाला दिल्ली पाठवायचे कोणाला मुंबईला पाठवायचे. नवीन शहर आराखडा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. कोणाचेही घरावर बुलडोझर न चालवता रस्ते बनवू. मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढला जाईल. शहराचा पाणीप्रश्न फेब्रुवारी 2025 पर्यंत सुटेल. आजच मनपात नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. 

अशी माहिती आपल्या भाषणात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी किराडपुरा येथे उद्घाटन कार्यक्रमात दिली.

यावेळी व्यासपीठावर आमदार प्रदीप जैस्वाल, मनपा प्रशासक जी श्रीकांत, मुख्याध्यापिका रईसा बेगम, समाजसेवक ओसामा अब्दुल कदीर, शाकेर खान, फेरोज खान, मनपा शहर अभियंता देशमुख आदी उपस्थित होते.

आज जागतिक क्रीडा दिनानिमित्त आम्हाला खेळू द्या अंतर्गत केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपूरा येथील क्रीडांगण विविध खेळांचे क्रिडांगण म्हणून विकसित करणे, अॅस्ट्रो टर्फ उभारणी करणे या प्रकल्पाचे भुमिपूजन करण्यात आले. हडको एन-10 येथील स्वामी विवेकानंद उद्यान , रोझ उद्यान व लगतचा परिसर अशा एकूण जवळपास 22 एकर परिसरात City Central Park विकसित करण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना या शासन निधी मधून साहसी उद्यानाचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केली.

ओसामा यांचे प्रयत्नाला यश मिळाले....

यावेळी समाजसेवक ओसामा अब्दुल कदीर यांनी सांगितले की हा मैदान व हाॅल खस्ताहाल झाले होते. येथे काही लोक नशा करत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे तक्रारी येत असल्याने कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना आणून परिस्थिती दाखवली‌. शाळा परिसरातील वातावरण चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. खेळाच्या मैदानाचा विकास व हाॅलच्या इमारतीची दुरुस्ती करून शाळेसाठी दिली. जानेवारी पर्यंत मैदानावर अॅस्ट्रो टर्फची उभारणी करण्यात येणार आहे याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना व परिसरातील मुलांना खेळण्यासाठी होईल यामुळे त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow