लहु प्रहार संघटनेच्या वतीने संविधान दिनी 35 प्रमुख वसाहतीत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन...
लहु प्रहार संघटनेच्या वतीने संविधान दिनी 35 प्रमुख वसाहतीत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि..25 (डि-24 न्यूज) - भारतीय संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी लहु प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील 35 प्रमुख वसाहतीसह इतर वसाहती मध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सिडको परिसरातील क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे,
आंबेडकर नगर, मिसारवाडी, नारेगाव, चिकलठाणा, हर्सुल, भाऊसिंगपुरा, जयभीम नगर, शताब्दी नगर, उस्मानपुरा, इंदिरानगर, विश्रांती नगर, नक्षत्रवाडी, जय भवानी नगर, ज्ञानेश्वर नगर, सिद्धार्थ नगर आदी प्रमुख वसाहतींसह शहरातील विविध भागांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रदान केली आहेत. संविधानातील अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी, संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच सामाजिक सलोखा, एकता आणि लोकशाही मजबूत व्हावी, या उद्देशाने लहु प्रहार संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे, संविधानाचा सन्मान, संविधानिक मूल्यांचे पालन आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी, असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
लहु प्रहार संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून शहरातील ३५ प्रमुख वसाहतीसह इतर ठिकाणी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, लहु प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, राज्य कार्याध्यक्ष कचरु कांबळे, राज्य संघटक मच्छिंद्र बहिलम, महासचिव राहुल घोरपडे, राज्य उपाध्यक्ष संदीप चांदणे, प्रवक्ते आनंद लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष यशराज इंचाळकर, जिल्हाध्यक्ष समाधान इंच्चे, शहराध्यक्ष कैलास भालेराव, कचरु घोरपडे, शेषराव शिंदे, विलास भालेराव, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली पवार, राज्य उपाध्यक्ष प्रिती पेटारे, संपर्क प्रमुख राजश्री साठे, राज्य कार्याध्यक्ष नंदिनी आव्हाड, मराठवाडा अध्यक्ष सुषमा इंच्चे, जिल्हाध्यक्ष आशा काळे, सरचिटणीस सविता घोरपडे आदींनी केले आहे.
What's Your Reaction?