लाडकी बहीण योजनेला मिळतोय चांगला प्रतिसाद, भाजपाने सुरू केले शहरात कॅम्प
लाडकी बहिण योजनेला मिळतोय प्रचंड प्रतिसाद...
मंत्री सावे यांच्या उपस्थितीत योजनेची सुरुवात...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
रविवारी औरंगाबाद मध्य विधासभा क्षेत्रातील खोकडापुरा आणि टीव्ही सेंटर मध्ये तर औरंगाबाद पूर्व मतदार संघातील आंबेडकरनगर येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी अनेक उपाय योजना, तसेच उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या योजनेचा विस्तार होवून अधिकाअधिक महिलांनी यासाठी पात्र ठरावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठीक ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीषजी बोराळकर, अनिल मकरिये, यांच्या सह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थि
ती होती.
What's Your Reaction?