भाजपाच्या वतीने मतदार नोंदणी व लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॅम्पचे आयोजन
 
                                मध्य विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॅम्पचे आयोजन...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज)
भारतीय जनता पार्टी मध्य विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख तथा प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवतजी कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, शहराध्यक्ष मा.शिरीष बोराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते
"भव्य मतदार नोंदणी अभियान" तसेच "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" कॅम्प खोकडपुरा केनेकर सर यांचे निवासस्थान व टीव्ही सेंटर चौक ,मुकेश जैन यांचे कार्यालय, येथे सुरु करण्यात आले.
तसेच ज्यांचे वय 21 ते 65 पर्यंत आहे त्यांनी जास्तीजास्त भगिनींनी यांचा लाभ घ्यावा नव मतदार नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.
यावेळी..
सरचिटणीस श्री.समीर राजूरकर, श्री.अनिल मक्रिये, सौ. उज्वला ताई दहिफळे, गुलमंडी मंडळ अध्यक्ष श्री.सिद्धार्थ साळवे, हडको मंडळ अध्यक्ष श्री.सागर पाले. युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री रामेश्वर भादवे, श्री महेश माळवतकर, श्री.राज वानखेडे, सौ.मीना मिसाळ, श्री. कचरू घोडके, सौ.प्राप्ती चव्हाण, श्री.नितीन चित्ते, श्री.बंटी चावरीया , श्री.भाऊसाहेब ताठे, श्री.रामलाल बकले, श्री.मुकेश जैन, सौ.सरदार ताई, सौ.खरे ताई, श्री.प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            