सातारा धार्मिक स्थळाची 62 एकरची एनओसी रद्द, वक्फ न्यायाधिकरणाचा बिल्डरला दणका...

सातारा धार्मिक स्थळाचा वक्फ ट्रिब्युलचा निर्णय आला 12 वर्षानंतर
62 एकर जमीनीची एनओसी व वक्फ बोर्डाचा ठराव रद्दबातल, वक्फ बोर्ड आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज),
मौजे सातारा, ता.जि.छत्रपती संभाजिनगर येथील गट क्रं.304 क्षेत्रफळ 24 हेक्टर 80 आर, एकूण 62 एकर हि मस्जिद खिदमात सेवाभावी जमीन आहे. या प्रकरणी विकासकाला दिलेल्या एन ओ सी व वक्फ बोर्डाने पारित केलेला ठराव वक्फ ट्रिब्युंलने रद्द केल्याने आता वक्फ बोर्ड काय कार्यवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर हा निर्णय आमच्या बाजूने लागला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत एड रुपा दक्षिणी यांनी सांगितले आहे.
जमीन हस्तांतरीत करणे बाबत उस्मानपुरा येथील रहीवासी बाबा मन्ना कुरेशी व सातारा येथील मुस्तफा दिलावर खान यांनी अर्ज क्रं.73/2013 महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद यांच्या न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणाची सतत 12 वर्ष सुनावणी चालली. अर्जदार व गैर अर्जदार व वक्फ मंडळाचे वडीलांचा युक्तीवाद ऐकूण न्यायाधिकरणाचे जिल्हा न्यायाधिश
आदील एम.खान व इतर दोन सदस्य यांनी 3 एप्रिल 2025 रोजी हा निकाल घोषित केला आहे.
काय आहे प्रकरण...
सन 2012 मध्ये मुतवल्ली/इनामदार व महाराष्ट्र वक्फ मंडळाचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एन.डी.पठाण यांनी संगनमताने कट कारस्थान रचून सदर इनाम जमीनीचे बनावट खोटे नाहरकत प्रमाणपत्र तयार करुन सदर 62 एकर जमीन विकासकांना विकास करारनामा आधारे हस्तांतरीत केली होती. जमीनीत विकासकांचा वाटा 88 टक्के व इनामदारांचा वाटा 12 टक्के राहिल असे दस्ताऐवजात व N.O.C. नमूद केले आहे. वास्तविक पाहता इनामाची जमीन कायद्याने हस्तांतरीत करता येत नाही. हि जमीन सातारा परिसर येथे बाजारभावाप्रमाणे एक हजार कोटी जवळपास किंमत आहे.
म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने वक्फ मंडळाने पारित केलेला ठराव क्रं.77, दिनांक 11/4/2010 रद्दबातल केला आहे. एनओसी प्रमाणपत्र दि.14/7/2011 व दि.19/10/2012 रोजी नोंदणी केलेले विकसन करारनामा दस्तावेज रद्दबातल केले आहे. वक्फ मंडळाचे सिईओ यांनी सदर जमीनीचा ताबा घेऊन मुतवल्ली विरुध्द कायदेशीर कार्यवाई करावी. अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.
अर्जदार यांच्या वतीने एड रुपा दक्षीणी यांनी अभ्यासपूर्ण युक्तीवाद केला. गैर अर्जदार यांच्या वतीने एड बागडीया व एड भंडारी यांनी युक्तीवाद केला. वक्फ मंडळ यांच्या वतीने उच्च न्यायालयाचे विविज्ञ नजम देशमुख यांनी युक्तिवाद केला.
What's Your Reaction?






