वंचितचा उमेदवार बदलल्याचा फेक लेटर व्हायरल, अफसरखानच औरंगाबादचे उमेदवार...!
वंचितचा उमेदवार बदलल्याचा फेक लेटर व्हायरल, अफसरखानच औरंगाबादचे उमेदवार
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभेचा उमेदवार बदलून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी दिल्याचा फेक लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव तय्यब जफर यांनी डि-24 न्यूजला सांगितले जो पत्र व्हायरल होत आहे तो फेक आहे. जे काही ऑफीशियल माहिती आहे ऑफीशिअल अकाउंटवर टाकली जाते. औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार बदलले नाही. अफसरखान हेच अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी प्रचार सुरू केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला होता दिवसभर या अफवेवर चर्चा सुरू झाली होती. तय्यब जफर यांनी व्हिडिओ जारी करुन हा संभ्रम दुर केला आहे. त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनाही संपर्क केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार दिल्याने समाजात नाराजी पसरली आहे. याचा प्रभाव अकोला लोकसभा निवडणुकीत होत असल्याचे चित्र आहे. तेथे मुस्लिम समाज यामुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुस्लिम मते आंबेडकर यांना मिळावे यासाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार अशीही चर्चा होती यामुळे तर हा फेक लेटर व्हायरल नसावा अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कोण आणि कशासाठी हा फेक लेटर व्हायरल केला आता चौकशीत निष्पन्न होईल.
What's Your Reaction?