वंचित बहुजन आघाडीचे आठ उमेदवारांची नावे जाहीर
वंचित बहुजन आघाडीचे आठ उमेदवारांची नावे जाहीर
मुंबई, दि.27(डि-24 न्यूज)
महाविकास आघाडी सोबत न जाता मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करुन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा मतदारसंघातील पहिल्या यादीत आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. वंचितमुळे कोणत्या पक्षांच्या उमेदवारांना फटका बसणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अकोला मतदारसंघातून एड प्रकाश आंबेडकर, भंडारा गोंदिया मतदार संघातून संजय गजानन केवात, अमरावती-कु.प्रजाक्ता तर्केश्वर पिल्लेवान, चंद्रपूर राजेश वार्लूजी बेले, बुलढाणा- वसंत राजाराम मगर, गडचिरोली- हितेश पांडुरंग मांडावी, वर्धा-प्रा.राजेंद्र साळुंके, यवतमाळ-वाशिम- सुभाष खेमसिंग पवार या उमेदवारांच्या नावांची घोषणा वंचितने केली आहे.
What's Your Reaction?