वक्फ बोर्डाने अलिशान हाॅटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन गुंडाळली बैठक...!
वक्फ बोर्डाने अलिशान हाॅटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन गुंडाळली बैठक...!
कोणते गुप्त ठराव घेतले याची माहिती सुध्दा माध्यमांना दिली नाही... गेली काही महिन्यांपासून नविन सीईओ आल्यावर वक्फ बोर्ड एक्शन मोडमध्ये आले असताना अपेक्षा वाढलेल्या आहेत पण यावेळी असे काय घडले ते गुलदस्त्यात दिसत आहे यामुळे भ्रम निर्माण झाला आहे...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) रेल्वेस्टेशन परिसरातील एका अलिशान हाॅटेलमध्ये लाखो रुपये खर्च करून तीन दिवस वक्फ बोर्डाच्या वतीने बैठक घेण्यात आली. परंतु या बैठकीत कोणते गुप्त ठराव घेण्यात आले याची माहिती माध्यमांना न देता बैठक गुंडाळली. 18 ते 20 ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हि बैठक घेण्यात आली. या बैठकीचे छायाचित्रे पण बाहेर आली नाही, किती सदस्य बैठकीत उपस्थित होते त्यांचेही नावे बाहेर आली नाही. यावेळी एवढी गुप्तता का पाळण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीची माहिती सार्वजनिक केली जाते मग वक्फ बोर्डाच्या बैठकीची माहिती सार्वजनिक का केली जात नाही अशीही गरम चर्चा आता सुरू झाली आहे.
नेहमी बैठक संपल्यानंतर वक्फ बोर्डाचे चेअरमन माध्यमांना निमंत्रित करुन सविस्तर माहिती दिली जाते परंतु यावेळी पत्रकार परिषद न घेता बैठक गुंडाळली यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील वक्फ मालमत्ता, मालमत्तेचे वाद विवाद, उत्पन्न, नवीन संस्था नोंदणी, कर्मचारी भरती विविध समस्या व उपाययोजना वर माहिती दिली जाते. हजारो एकर जमीन वक्फ बोर्डाची असताना भाड्याने हाॅटेलमध्ये लाखो रुपये खर्च करून बैठक घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रकरणी काही लोकांनी वक्फ बोर्डाच्या चेअरमन यांना निवेदन दिले.
शहरातील भव्य स्मार्ट सिटी कार्यालय वक्फ बोर्डाच्या जागेवर बनलेले असताना भाडे खर्च करून बैठक घेतली जात आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात हि बैठक का घेतली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनींवर अवैध अतिक्रमण झालेले आहे. संबंधितांवर कारवाई न करता फक्त नोटीस देण्याचा सपाटा लावला जात आहे. या मालमत्ता वक्फ बोर्डाने कडक कारवाई करुन ताब्यात घ्यावी, जे जागा भाड्याने दिली आहे त्यांचे रेडिरेकनर दराने भाडे वसूल करावे अशी मागणी असताना ठोस पावले उचलली जात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. अनेक प्रश्न असताना यावेळी गुप्त बैठक घेतली यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
What's Your Reaction?