जिल्हा श्री गणेश महासंघाच्या "श्री"ची उद्या प्रतिष्ठापणा

जिल्हा श्री गणेश महासंघाच्या "श्री"चीं उद्या प्रतिष्ठापणा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य उत्सव' म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर, यंदा होणारा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून श्री गणेश चतुर्थी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या "श्री"चीं प्रतिष्ठापना आज (दि. 27) मान्यवरांच्या उपस्थितीत अजबनगर येथील महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10-30 वाजता शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, यांच्यासह श्री गणेश भक्तांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
स्वाभिमान संस्कृतीचा....अभिमान उत्सवाचा... हे ब्रीद घेऊन श्री गणेश महासंघ यंदा 101 वे वर्ष साजरे करत आहे. यामध्ये गणेश भक्तांच्या सहभागाने श्री गणेशोत्सवाची सुरुवात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून “नशामुक्त” छत्रपती संभाजीनगर हा संकल्प घेऊन विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी दिली.
एक झाड... एक अभियान....
छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती च्या वतीने पुढाकार घेतला असून यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाच्या संवर्धनार्थ सामाजिक दायित्व म्हणून "एक झाड... एक मंडळ" हे वृक्षारोपण अभियान बुधवार, दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी, सकाळी 10.30 वाजता, औरंगापुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर राबविण्यात येणार आहे. सर्व गणेश भक्त तसेच मंडळानी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले आहे.
What's Your Reaction?






