वक्फ बोर्ड भरती परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, उमेदवारांचा हिरमोड
वक्फ बोर्ड भरती परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, उमेदवारांचा हिरमोड
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) विविध पदांच्या भरतीसाठी वक्फ बोर्डाच्या वतीने उमेदवारांची लेखी परीक्षा 16 आणि 17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे पुन्हा एकदा हि परीक्षा पुढे ढकलली असल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. याच तारखेला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आयोजित केल्याचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे. परीक्षा घेणारी एजन्सी व वक्फ बोर्ड प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसत असल्याने दोनदा हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील परीक्षेची सुधारीत तारीख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती वक्फ बोर्डाचे सिईओ मो.बो.ताशिलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
What's Your Reaction?