वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात शहरात अंधार...बत्तीगुल आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा...!

वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात शहरात अंधार...बत्तीगुल आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) नवीन वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर केला परंतु या कायद्याला देशातील मुस्लिम समाजाचा विरोध आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने देशव्यापी आंदोलन या कायद्याच्या विरोधात सुरू आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज रात्री 9 ते 9.15 वाजेपर्यंत घर, दुकाने, कार्यालय, धार्मिक स्थळांचा विजेचा प्रवाह बंद करून बत्तीगुल आंदोलन करण्यात आले. शहरातील मुस्लिम बहुल भागात रस्त्यावर अंधारच अंधार पडला होता. फक्त रस्त्यावर जाताना वाहनांचे लाईट सुरू होते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना इलियास फलाही यांनी दावा केला आहे की बत्तीगुल आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. वक्फ संशोधन कायदा आम्हाला मान्य नाही. हे आंदोलन आज एकाच वेळी देशभरात केले आहे. हा काळा कायदा सरकारने रद्द करावा. कायदा रद्द केला नाही तर लोकशाही मार्गाने व शाततेत तीव्र आंदोलन करण्यात येईल. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन भविष्यात करण्यात येणार आहे. वक्फ संशोधन कायदा हा संविधान विरोधी आहे. वक्फ बोर्डाच्या जमीनी लाटण्यासाठी हा कायदा बनवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जमात-ए-इस्लामी हिंदचे पदाधिकारी इंजिनिअर वाजेद कादरी यांनी सांगितले बत्तीगुल आंदोलन रोशन गेट, कटकट गेट, शहागंज, सिटी चौक, पैठणगेट, भाजीमंडी, सिल्लेखाना, समतानगर, खोकडपुरा, भडकलगेट, टाऊनहाॅल, बेगमपुरा, आसेफिया काॅलनी, मंजूरपुरा, जुना बाजार, बुढीलेन, किराडपुरा, बारी काॅलनी, सेंट्रल नाका, बायजीपुरा, संजयनगर, किलेअर्क, एसटी काॅलनी, गणेश काॅलनी, रशिदपुरा, हडको काॅर्नर, दिल्लीगेट, हिमायतबाग, रोझाबाग, नॅशनल काॅलनी, जहागिर काॅलनी, मुजफ्फरनगर, सईदा काॅलनी, केजीएन पार्क, पटेल प्लॅनेट, अंबर हिल, बशिर नगर, हर्सुल, बेरीबाग, हुसेन काॅलनी, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन सादात नगर, सातारा देवळाई, घाटी परिसर, पडेगांव, चांदमारी, विद्यापीठ गेटसमोर, छावणी, व मुस्लिम बहुल भागात नागरीकांनी बत्तीगुल आंदोलनात सहभागी झाले त्याबद्दल आभार मानले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येणार आहे जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेणार नाही नागरीकांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






