वाहनांची बनावट कागदपत्रे नंबर प्लेट तयार करून विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
वाहनांची बनावट कागदपत्रे बनावट नंबर प्लेट तयार करून विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुंजखेडा ता. कन्नड येथे नोकरीस असलेला इसमनामे इब्राहीम अमीन पटेल मु. रा. भाट आंतरवली ता. गेवराई जि. बीड ह.मु. कुंजखेडा हा त्याचे इतर साथीदारामार्फत राज्यातील परराज्यातील चोरीची वाहने आणून त्यावर बनावट क्रमांक टाकून बनावट कागदपत्रे तयार करून तो त्याची कमी पैशांमध्ये विक्री करत आहे तसेच काही वाहने विक्री केलेले आहेत व सध्या त्याच्या ताब्यात कुंजखेडा येथे बुलेट व दिल्ली पासींगची क्रियेटा गाडी आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्याची खातरजमा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करणेकामी पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शननुसार पोउपनि मधुकर मोरे व त्यांची टिम यांना रवाना केले.
त्यांनी त्यांच्या पथकासह कुंजखेडा येथे जावून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी खात्री केली असता इसमनामे इब्राहीम अमीन पटेल यास ताब्यात घेवून कुंजखेडा येथे असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये लावण्यात आलेल्या क्रियेटा व बुलेट वाहनांसंबंधी विचारपूस केली असता. त्यांने सांगितले की त्याचे साथीदाराने सदरचे वाहन मला आणून दिलेले आहेत. तसेच यापुर्वीपण त्याचे माझ्याकडे 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 1 महिंद्रा माझा सेव्हन सिटर, 2 बुलेट, 1 टाटा सफारी, 1 सप्लेंडर गाडी, हुंदाई कंपनीच्या 2 क्रियेटा गाडया व 1 महिन्द्र बुलेरो पिकअप अशा दिलेल्या आहेत. त्या मी यापूर्वी कमी किंमतीमध्ये विक्री केलेल्या आहेत. अशी माहिती दिलेल्याने त्याच्या माहिती वरून खालील प्रमाणे मुददेमाल वाहने जप्त केली आहेत. त्याच्या ताब्यातील बुलेट क्रमांक एमएच-24 अक्यू 5883 या नंबरची खात्री केली असता मुळ मालक हा शेख जुनैद शेख चाँद रा. हिंगणी हवेली हिरापूर जि. बीड याच्या नावावर असून सदर वाहनाचे चेसीस क्रमांक ME3U3SSCIHA046301 असा असल्याचे सांगितले आम्ही वाहनाचे चेसीस क्रमांकाची खात्री केली असता. सदरचा चेसीस क्रमांक व वाहनावर टाकलेला बनावट क्रमांक हा बनावट असल्याचे सांगून त्याचा मुळ चेसीस क्रमांक ME3U3SSCIGE591694 असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा चेसीस क्रमांक हा राजस्थान अजमेर परिवहन कार्यालय व तोच चेसीस क्रमांक हरियाना राज्यातील चारखीदादरी परिवहन कार्यालयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद इंजिन क्रमांकामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे...
तसेच त्याने विक्री केलेली 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 1 महिंद्रा माझा सेव्हन सिटर, 2 बुलेट, 1 टाटा सफारी, 1 सप्लेंडर गाडी, हुंदाई कंपनीच्या 2 क्रियेटा गाड्या व 1 महिंद्र बुलेरो पिकअप क्रियेटा असे एकूण 12 वाहने एकूण किंमती 1,22,00,000/- रूपये वाहने जप्त करण्यात येवून नमूद इसमांविरुध्द पोस्टे कन्नड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येवून अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष बाघ, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि मधुकर मोरे, पोह/ कासम पटेल, भागीनाथ आहेर, रवि लोखंडे, विठठल डोके, गोपाल पाटील, दिपक सुरोशे, आनंद घाटेश्वर, राहूल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप, जनाबाई चव्हाण, कविता पवार व चालक संतोष डमाळे यांनी केली आहे.
What's Your Reaction?