विकास आराखड्यात प्राचिन मंदीर बाधित करण्याचा प्रयत्न, अधिका-यांची चौकशी करण्याची संजय केनेकर यांची मागणी ...

 0
विकास आराखड्यात प्राचिन मंदीर बाधित करण्याचा प्रयत्न, अधिका-यांची चौकशी करण्याची संजय केनेकर यांची मागणी ...

विकास आराखड्यात प्राचिन मंदीर बाधित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केनेकर यांची मागणी...

पुरातन मस्जिद, दर्गा, कब्रस्तान पण या डिपी प्लॅन मध्ये बाधित होणार आहे त्यांना पण वाचवण्यासाठी केनेकर पुढे येणार का... शहरातील नागरिकांचा प्रश्न...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे विधानपरिषद सदस्य संजय केनेकर यांनी पुन्हा एकदा नवीन शहर विकास आराखड्यावर प्रश्न उपस्थित करत, या आराखड्यात शहरातील हिंदू धर्मियांची मंदिरे बाधित होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप करत, या सर्व प्रकरणाची निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 

महापालिकेचा नवीन शहर विकास आराखडा - 2025 शासन स्तरावर मंजुरीसाठी सादर केलेला आहे. या आराखड्यात हिंदू धर्मियांची शहरातील जुनी 10 ते 15 प्राचिन मंदिरे बाधित होत आहेत. यात ऐतिहासिक संस्थान गणपती व ग्रामदैवत असलेल्या मंदिरांचाही समावेश आहे. नियोजित विकास आराखड्याच्या आधारे महानगरपालिकेच्या वतीने हि हिंदू धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई भविष्यात केली जावू शकते. हा आराखडा तयार करताना नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत. त्यावेळी आराखडा तयार करणारे रजा खान यांच्यावर त्यांनी टिका करताना सांगितले की विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळांना वाचवण्यात आले. याबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर मनपा प्रशासनाकडून माहिती मागविली असता, अतिक्रमणे करून बांधलेल्या इतर धार्मिकस्थळांना संरक्षण दिल्याचे दिसून आले आहे. नवीन आराखडा तयार करताना, गाव नकाशाचा विचार केला नाही. आराखडा तयार करताना धार्मिक व ऐतिहासिक वास्तू वाचविणे गरजेचे होते. या सगळ्या अनागोंदी कारभाराची हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी प्रश्न उपस्थित केल्याचेही आमदार केनेकर म्हणाले. मनपा प्रशासनाकडून अनेक प्रश्नाबाबत माहिती मागविली आहे, मात्र त्यांनी माहितीच दिली नाही. आता हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेवून, त्याचा सोक्षमोक्ष लावणार, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडामोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow