विभागीय आयुक्तांनी घेतला शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा...
 
                                विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगर पालिका प्रशासन सहआयुक्त देवीदास टेकाळे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री.पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहिर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या, ॲप्रोच ब्रिज यासह पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            