विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांना मातृशोक...!
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांना मातृशोक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- दिनांक सप्टेंबर 2026 रोजी सकळी माजी स्थाई समिती सभापती अब्दुल साजिद (दिवंगत )यांच्या पत्नी तसेच माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर व विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्या मातोश्री श्रीमती खतीजा बेगम अब्दुल साजिद बिल्डर साजिद यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 60 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले व 1 मुलगी असा परिवार आहे.
त्यांचा नमाज-ए-जनाजा शाहगंज येथील मशिदीत अदा करण्यात आला. त्यानंतर त्यांचा दफनविधी पीरगेब साहेब कब्रस्तान, एस.टी. कॉलनी, फाजलपुरा येथे करण्यात आला.
या दुःखद प्रसंगी साजिद कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?