विशेष पुनरिक्षण प्रक्रीयेत राजकीय पक्षांच्या बुथ प्रतिनिधींनी सहयोग द्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

 0
विशेष पुनरिक्षण प्रक्रीयेत राजकीय पक्षांच्या बुथ प्रतिनिधींनी सहयोग द्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या बुथ प्रतिनिधींनी

सहयोग द्यावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे कामकाज सुरु आहे. या कामात मतदान केंद्रस्तरावर काम करणाऱ्या बुथ प्रतिनिधींनी सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. मनपाचे अपर आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधर, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड आदी उपस्थित होते. तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी गौडा यांनी आवाहन केले की, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आता घरोघरी भेटी सुरु आहेत. तेथे मतदारांना पडताळणी अर्ज भरुन घेतला जात आहे. त्यासाठी राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी आपल्या स्थानिक संपर्काचा वापर करुन फॉर्म मतदारांकडून भरुन घ्यावे व जमा करावे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सगळीकडे आपले बुथ प्रतिनिधी नियुक्त करावे व या कामात सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow